फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडिया सेन्सेशन आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद केव्हा काय करेल आणि काय नाही याचा काय नेम नाही. कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीच्या एका बातमीने सर्वांचेच लक्ष वेधलेय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे चाहत्यांमध्ये ती चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा साखरपुडा झाला असल्याचे काही फोटोज् व्हायरल होत आहे.
व्हायरल फोटोमध्ये उर्फीच्या बोटात एक मुलगा अंगठी घालताना दिसत आहे. हा फोटो एका साखरपुड्याचा असल्याचे दिसून येत आहे. फोटोमध्ये तिच्या बोटात एक तरुण गुडघ्यावर बसून अंगठी घालताना दिसतोय. तो फोटो पाहून उर्फीने गुपचूप साखरपुडा उरकला का? असा प्रश्न चाहते विचारत आहे.
‘जिओ हॉटस्टार’ने उर्फी जावेदच्या साखरपुड्या दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेले व्हिडिओ पाहून उर्फीने साखरपुडा केल्याचे म्हटले जात आहे. फोटोत उर्फी जावेद एका तरुणासमोर उभी असल्याचे दिसत आहे. तो तरुण गुडघ्यावर बसून तिच्या बोटात अंगठी घालताना दिसतोय. विशेष म्हणजे फोटोमध्ये चांगला मंडप सजवण्यात आल्याचं दिसत आहे. साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहून तिच्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या नेटकऱ्यांमध्ये उर्फीसमोर असलेल्या तरुणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. व्हिडिओ आणि फोटोंवर नेटकरी हा तरुण नेमका कोण आहे? असा प्रश्न कमेंट करत चाहते विचारत आहेत.
सध्या उर्फीच्या साखरपुड्याच्या फोटोंवर आणि व्हिडिओंवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तिचे अनेक चाहते या फोटोला प्रमोशनल स्टंट म्हणत होते. उर्फी व्हिडिओत म्हणते की, “हे प्रेम सोपे नाहीये, फक्त हे समजून घ्या की विश्वासघाताचा धोका आहे, निघून जाण्यापूर्वी तुम्हाला त्यांना थांबवावे लागेल. #EngagedRokaYaDhoka आणि हा शो 14 फेब्रुवारीपासून Disney+ Hotstar वर स्ट्रीम होईल.” याचा अर्थ असा की, उर्फीने तिच्या रियल लाईफमध्ये साखरपुडा केला नसून हा तिच्या आगामी प्रोजेक्टचा भाग आहे. साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ हे तिच्या आगामी शोचे प्रमोशन असल्याचे स्पष्ट झाले आहे. या शोमध्ये तिच्या सोबत स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजराल शोचं होस्टिंग करत स्क्रिन शेअर करणार आहे.