सोनाक्षी-झहीरचे लग्न
सोनाक्षी-झहीरचे लग्न :बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Actress Sonakshi Sinha) आता लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री झहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्न करणार आहे. या दोघांच्या लग्नाच्या बातम्या वाऱ्यासारख्या सोशल मीडियावर सुरु आहेत. या दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले आहे. परंतु त्यांनी कधीही या दोघांच्या नात्याचा खुलासा केला नव्हता. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर आता हे जोडपे त्यांच्या आयुष्याच्या नव्या टप्प्याकडे जाण्यासाठी सज्ज झाले आहे. या दोघांच्या लग्नाच्या विधी २१ जून पासून सुरु झाल्या आहेत. अभिनेत्रींच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आता चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्रीला वधू बनताना पाहण्याची उत्सुकता लागली आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन कुठे होणार? लग्नाचा ड्रेस कोड काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल (Sonakshi-Zaheer wedding) यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हिंदू किंवा मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न करणार नसून दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, त्यांच्या लग्नाची अजुनपर्यत तारीख स्पष्ट नाही, कारण शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये 23 जून रोजी लग्न नसून रिसेप्शन असल्याचे सांगितले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार कोर्ट मॅरेजनंतर त्यांच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन आज म्हणजेच २३ जून रोजी मुंबईतील बस्तियान येथे आयोजित करण्यात आले आहे. जे रात्री 8 वाजता सुरू होईल. यामध्ये सलमान खानपासून ते हुमा कुरेशीपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.
काही दिवसांपूर्वी सोनाक्षी-झहीरच्या अनोख्या लग्नाचे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये त्यांनी लग्नाचा ड्रेस कोड उत्सवाचा आणि औपचारिक असेल असे लिहिले होते. फक्त लाल रंगाचा ड्रेस घालून येऊ नका.