प्रेक्षकांची आवडती वेबसिरिज गुल्लकच्या चौथ्या सिझनचा (Gullak Season 4) ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षक अनेक दिवासापासून या सिरीजच्या चौथ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर निर्मात्यांनी गुल्लक 4 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या वेबसिरिजमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा मजेशीर शैलीत दाखवण्यात आली आहे. पहिला सीझन हिट झाल्यानंतर त्याचे दुसरे आणि तिसरे भागही आले. ‘गुलक’चा तिसरा सीझन 2022 मध्ये रिलीज झाला होता. दोन वर्षांनंतर त्याचा चौथा सीझनही आला आहे.
‘गुलक सीझन 4’ चा ट्रेलर आज 19 मे रोजी रिलीज झाला आहे. यावेळी कथा अमन (हर्ष मेयर) भोवती फिरताना दिसणार आहे. प्रौढावस्थेत तो कसा हळूहळू चुकीच्या मार्गाकडे जात आहे. पिगी बँकेतून पैसे चोरण्यापासून ते दाढी न वाढवल्याबद्दल नाराज होण्यापर्यंत, कॉलेजमध्ये प्रवास आणि मस्ती करण्यापर्यंत, अमन कथेला नवा ट्विस्ट आणणार आहे.
त्याला परत रुळावर आणण्यासाठी कुटुंब प्रयत्नशील असेल. अन्नूचा (वैभव राज) लव्ह अँगलही पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये तो ऑफिसमध्ये एका मुलीच्या (हेली शाह) प्रेमात पडतो असे दिसून येते. ट्रेलर पाहून यावेळेसही मिश्रा परिवार गोड-गोड बोलून प्रेक्षकांना हसवणार यात शंका नाही़
या सीझनमध्ये एका नव्या कलाकारची भूमिका पाहायला मिळणार आहे. वेबसिरीजमध्ये हेली शाहची एन्ट्री झाली आहे. अमनची भूमिका हर्ष मायार, वैभव राज अन्नू, जमील खान, संतोष मिश्रा आणि शांती गीतांजली कुलकर्णी यांनी साकारली आहे. याशिवाय सुनीता राजवारही मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका 7 जूनपासून OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर स्ट्रीम होईल.