फोटो सौजन्य - Social Media
ठाण्याहून मुंबईला जाताना किंवा गुजरातच्या दिशेने जाताना सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे घोडबंदर रोड! या रोडवर अतिशय वाहतूक कोंडी असते. येथे रस्त्यावर पडलेले खड्ड्यांमुळे नियमित अपघात होत असतात आणि वाहतुकींची कोंडीही अफाट होत असते. दरम्यान, अभिनेता आस्ताद काळेने या प्रसंगी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून अतिशय शांत आणि सम्मानपूर्वक राज्यातील पुढाऱ्यांना या रस्त्याच्या परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.
घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकला कंटाळून आस्तादने केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये गूगल मॅप शेअर केला आहे. त्यामध्ये केवळ २४ तासांच्या रस्त्यासाठी १ तास ५४ मिनिटे लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यापेक्षा भयंकर म्हणजे ४३ मिनिटांची फक्त ट्राफिक आहे. अगदी ९ दिवसांपूर्वी पडलेल्या एका खड्ड्यामुळे वाहनांची मोठीच मोठी रंग येथे लागली आहे.
अभिनेत्याने अगदी शांतपणे आणि सम्मानपूर्वक सरकारला या गोष्टीची जाणीव करून दिली आहे. कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “@thanemahapalika @pmc_pune @my_bmc एकनाथ शिंदे काका, देवेंद्र फडणवीस काका, प्रताप सरनाईक काका, अजित पवार काका, शरद पवार आजोबा, अशोक चव्हाण काका, नारायण राणे काका….आणि अशाच माझ्या कळत्या वयात मी पाहात आलेल्या सर्व मंत्री काका,काकू आजी आणि आजोबांनो…. तुम्हा सर्वांना सा.न.वि.वि.( उद्धव काकांना टॅग करता येत नाहीये.) या महाराष्ट्राच्या अगणित नागरिकांच्या वतीनी मी तुमचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या महाराष्ट्राचे गौरवस्थान, अभिमानबिंदू!!! त्यांना त्यांच्या रयतेची किती काळजी होती हे आम्ही जाणतोच. पुन्हा असा राजा, असा द्रष्टा होणे नाही हा आमचा विश्वास तुम्ही सर्वांनी आजवरच्या तुमच्या कारकीर्दीतून अजून अजून दृढ बनवत नेलात त्यासाठी आभारी आहोत. कळावे, लोभ असावा, एक महाराष्ट्रीय,भारतीय करदाता नागरीक.”
आस्तादने केलेल्या पोस्टखाली नेटकऱ्यांनी त्यांचे हाल मांडले आहेत. एका नेटकऱ्याने म्हंटले होते की,”सगळी कडे हीच परिस्थिती आहे… नवीन फ्लायओव्हर्स मेट्रो महामार्ग तयार करण्या पेक्षा आहे ते रस्ते नीट करावे… जास्त काही चे स्वप्न दाखवण्या पेक्षा फक्त आहे ते रस्ते व्यवस्थित केले तरी उपकार होतील…” तर एकाचे म्हणणे आहे की,” हे सगळं अगदी फ्रस्ट्रेटिन्ग आहे.”