राधिका आपटेला आई व्हायचं नव्हतं, तरीही राहिली प्रेग्नेंट; स्वत:च केला खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे नुकतीच आई झाली आहे, तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि गायक बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. लग्नाच्या १२ वर्षांनंतर अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना ‘गोड बातमी’ दिली आहे. लेकीला जन्म दिल्यानंतर अभिनेत्रीने मुलाखतीतून महत्वाचा खुलासा केला आहे. तिने केलेल्या खुलासाची जोरदार चर्चा होत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिका आपटेने जेव्हा तिला ती गरोदर असल्याचे कळले, तेव्हाच्या भावना तिने मुलाखतीतून सांगितल्या. राधिका म्हणाली, “ही फार विचित्र गोष्ट आहे. खरंतर, ही गोष्ट मला सार्वजनिक पद्धतीने सर्वांना सांगायची नव्हती, पण तरीही मी सर्वांना सांगितले. मी चुकून प्रेग्नेंट राहिले नव्हते आणि आम्ही आई- बाबा होण्याचा प्रयत्नही करत नव्हतो. कारण जेव्हा मी गरोदर असल्याचं मला कळालं, तेव्हा आम्हाला दोघांनाही धक्काच बसला. कारण आम्ही ज्या गोष्टीचा केव्हा विचारंच केला नव्हता, त्यावेळी ते सर्व काही होऊन बसलं होतं.”
‘मुफासा’चे जबरदस्त कलेक्शन; शाहरुख आणि अबराम खानच्या आवाजाने जिवंत झाले पात्र!
मुलाखती दरम्यान राधिकाने पुढे सांगितले की, “मला वाटतं की, जेव्हा लोकांना हे माहीत असतं की त्यांना बाळ हवंय की नाही, तेव्हा इतरत्र गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होतात. पण आमच्या बाबतीत आम्हाला दोघांनाही बाळ नको होतं, पण बाळ झाल्यानंतर ते कसं असणार याची आम्हाला कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर आम्ही याविषयी पुढे जावं की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला.” राधिका आपटे तिचं वैयक्तिक आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा विशेष प्रयत्न करत होती. पण जेव्हा ती बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पोहोचली, त्यावेळी तिचा बेबीबंप पाहून सर्वच थक्क झाले होते.
“झुकेगा नहीं साला…” कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारने सल्लागार समिती नेमल्याने दिलजीत दोसांझची नाराजी
मुलाखतीच्या शेवटच्या भागात राधिकाने सांगितलं की, “बाळाच्या जन्माच्या एक आठवड्यापूर्वीच आम्ही फोटोशूट केलं होतं. खरंतर, त्या काळात मला माझं स्वत:चं शरीर सांभाळणंच फार कठीण जात होतं. माझं वजन आजपर्यंत इतकं केव्हाच वाढलं नव्हतं. अक्षरश: माझं शरीर सुजलं होतं. अंग प्रचंड दुखायचं आणि झोप येत नसल्यामुळे माझ्या मनात नको ते विचार यायचे. आता मला आई होऊन दोन आठवडेही झाले नाहीत आणि माझ्या शरीरात पुन्हा बरेच बदल झाले आहेत. आता मी माझे शरीर स्वीकारले आहे. हे सगळे नवीन अनुभव आहेत. मी नवीन गोष्टी शिकत आहे. माझा दृष्टीकोनही बदलला आहे. आता मी या फोटोंकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. आता मला या बदलांमध्ये फक्त सौंदर्य दिसत आहे. हे फोटो मला नेहमी लक्षात राहतील.”