आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या प्रेमकथेला सुरुवात करणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. आपण ‘ब्रह्मास्त्र’ बद्दल बोलत आहोत. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते आणि ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांच्या आनंदाला सीमाच उरली नाही.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट पौराणिक कथांवर आधारित असून, त्याचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ट्रेलरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने होते. या ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा सांगण्यात आली आहे. असा करिष्मा दाखवला आहे जो याआधी कोणत्याही चित्रपटात दाखवला गेला नाही. या ट्रेलरमध्ये महाबली आणि सर्वशक्तिमान शस्त्र शोधण्याची कहाणी सांगण्यात आली आहे.
या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरशिवाय अमिताभ बच्चन, साऊथचा सुपरस्टार नागार्जुन आणि मौनी रॉय यांची झलक दाखवली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून ‘ब्रह्मास्त्र’मधील रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भूमिका चांगलीच असणार आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. मौनी रॉय नकारात्मक भूमिकेत खूपच किलर दिसत आहे.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात शानदार व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षांपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, मात्र कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. या चित्रपटासाठी सर्वच स्टार्सनी खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपटाचा पहिला भाग आहे, त्याचा दुसरा भागही लवकरच तयार होणार आहे. रणबीर-आलियाचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि याच वर्षी १४ एप्रिलला दोघांनी लग्नगाठ बांधली.