नेतन्याहूंची चिंता वाढली! लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची सुत्रे इराणच्या हाती; इस्रायल संपवण्याचा खामेनेईंचा 'मास्टर प्लॅन'? (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
अमेरिकेच्या इराणवरील वाढत्या दबावामुळे इराण हिजबुल्लाहच्या मदतीने इस्रायलवर लेबनॉनमध्ये दबाव निर्माण करण्याची शक्यता आहे. यामुळे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने हिजबुल्लाहची कमांड हाती घेतली आहे. ज्यामुळे इस्रायलची चिंता वाढली आहे. अशा परिस्थिती युद्धाची ठिणगी उडाल्यास प्रचंड अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमेरिका इराणमध्ये युद्ध झाल्यास हिजबुल्लाहने स्वत:ला यापासून दूर ठेवावे अशी मागणी केली जात आहे. मात्र इराण हिजबुल्लाहवर इस्रायलविरुद्ध लढण्यासाठी दबाव आणत आहे. हिजबुल्लाहचे प्रमुख नैम कासेम यांनी गेल्या महिन्यात यापासून दूर राहण्याचे स्पष्ट केले होते. परंतु इराणच्या दबावामुळे हिजबुल्लाह युद्धात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे इस्रायलला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
या दोन्ही परिस्थिती पाहता इराण सध्या दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी करत असल्याचे चित्र दिसून येत आघे. याचे जागतिक स्तरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
Ans: सौदीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या रिव्होल्शनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची कमांड पुन्हा हाती घेतली आहे.
Ans: IRGC ने अधिकारी लेबनॉनच्या बेका खोऱ्यात हिजबुल्लाहच्या युनिटच्या सदस्यांची भेट घेतली आहे. यामुळे इस्रायलने तातडीने हल्ला केला असून यामध्ये किमान १२ लोक ठार झाले आहेत, तर ५० हून अधिकारी जखमी झाले आहे.






