२ वेळा राष्ट्रीय पुरस्कार, वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत; कसा आहे कोंकणा सेनचा बॉलिवूडचा प्रवास?
दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिचा आज (३ डिसेंबर) वाढदिवस आहे. चमचमत्या दुनियेत फॅशन आणि लूक या गोष्टींपासून चार हात लांब राहणाऱ्या कोंकणा सेन हिच्या अभिनयाचे फक्त देशातच नाही तर, जगभरात अनेक चाहते आहेत. तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच कौतुक करायला लावले आहे. कोंकणा जरीही अभिनयामुळे चर्चेत राहिली असली तरीही ती तितकीच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.
फॅशनिस्टा सोनम कपूरचं क्लासी फोटोशूट चर्चेत
कोंकणाचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी झाला. कोंकणाची आई सुद्धा फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. कोंकणाची आई अपर्णा सेन त्यांच्या काळातील एक उत्तम अभिनेत्री होत्या. कोंकणाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिचे वडील मुकुल शर्मा पत्रकार होते आणि आई अपर्णा सेन या दिग्दर्शिका आणि अभिनेत्री होत्या. २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘तितली’ चित्रपटातून कोंकणाच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि कौतुक मिळाले. लहानपणापासूनच घरात सिनेपार्श्वभूमी असल्याने कोंकणाने बालपणापासूनच फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली होती.
कोंकणाने १९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘इंदिरा’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर तिने एका बंगाली चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या इंग्रजी चित्रपटाने तिला अभिनयविश्वात खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामधील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले, तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सर्वात पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कोंकणाचा २००७ साली ‘ओंकारा’ आणि २००८ साली ‘लाइफ इन अ मेट्रो’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. या दोन्ही चित्रपटातल्या तिच्या अभिनयाने सलग दोन वर्ष सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कोंकणाने साकारलेल्या प्रत्येक पात्राला भरभरून प्रेम मिळालं आहे, तिला वेगवेगळ्या पुरस्कारांनी तिच्या फिल्मी करियरमध्ये गौरविण्यात आलं आहे. तिचं फिल्मी करियर जितकं चर्चेत राहिलं, तितकंच तिचं वैयक्तिक आयुष्यही कमालीचं चर्चेत राहिलं. लग्नाआधीच कोंकणा गर्भवती झाली होती. यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. कोंकणा ‘आजा नच ले’ हा रिॲलिटी शो करत होती. या शोच्या सेटवर तिची अभिनेता रणवीर शौरीसोबत ओळख झाली. ओळखीनंतर त्यांच्यात छान मैत्री झाली पुढे त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. २००७ पासून रणवीर आणि कोंकणा एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ३ सप्टेंबर २०१० साली ते लग्नबंधनात अडकले.
लग्नबंधनात अडकल्यानंतरच्या सहा महिन्यांनंतर अभिनेत्रीला मुलगा झाला. दरम्यान, तिने १५ मार्च २०११ साली मुलाला जन्म दिला, त्याचं नाव हारोन शोरे असं आहे. लग्नानंतर मोजून सहा महिन्यानंतरच अभिनेत्रीने ‘गोड बातमी’ दिल्याने ती लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचं बोललं जातं होतं. लेकाच्या जन्मानंतर रणवीर आणि कोंकणाचं नातं फार काळ टिकलं नाही. त्याचं नातं लग्नानंतर पाच ते सहा वर्षंच टिकलं. लग्नाच्या ५ वर्षानंतर दोघांमध्ये प्रचंड मतभेद सुरू झाले. या दरम्यान कोंकणाने पती रणवीर शौरीचे घर सोडले आणि ती मुलासोबत वेगळे राहू लागली. २०२० मध्ये दोघांचाही कायदेशीररित्या घटस्फोट झाला आणि तेव्हा पासून ते वेगळे झाले. पतीपासून विभक्त झाल्यापासून कोंकणा लेकाचा एकटा सांभाळ करत असून ती फिल्म इंडस्ट्रीतही सक्रिय आहे.
सोनू निगम आणि बेला शेंडे पुन्हा एकत्र येणार, ‘रुखवत’ मधील गाणं ‘ऋतु प्रेमवेडा’ रिलीज…
कोंकणाच्या चर्चेत राहिलेल्या चित्रपटाबद्दल बोलायचं तर, तिने ‘वेक अप सिड’, ‘पेज 3’, ‘लाईफ इन अ मेट्रो’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘दोसार’, ‘15 पार्क एव्हेन्यू’ यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सर्वच चित्रपटांतील अभिनयाला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.