प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह बाथटबमध्ये आढळला, मृत्यूचं गुढ कायम
जपानमधल्या इंडस्ट्रीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ५४ वर्षीय जपानी अभिनेत्री आणि गायिका मिहो नाकायमा हिचा मृत्यू झाला आहे. टोकयोतल्या एबिसू भागातील राहत्या घरी अभिनेत्री बाथटबमध्ये पडून मृतावस्थेत आढळली आहे. नाकायामाला शुक्रवारी ६ डिसेंबर २०२४ रोजी एका खासगी कार्यक्रमात परफॉर्मन्स करायचा होता. मात्र प्रकृतीचं कारण देत तिने कॉन्सर्ट रद्द केला होता. त्यानंतर ती घरातील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरभी हांडेची एन्ट्री! साकारणार म्हाळसाची भूमिका
मिहो नाकायामा हिच्या एजन्सीने शुक्रवारी (६ डिसेंबर रोजी) एका निवेदन प्रसिद्ध करून तिच्या मृत्यूची माहिती दिली. “मिहो नाकायामाच्या निधनाचे वृत्त सांगताना आम्हाला वाईट वाटत आहे. ही घटना अचानक घडल्याने आम्हाला धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर तिच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे.” असं निवेदनात म्हटलं आहे. नाकायामा शुक्रवारी ओसाका येथे ख्रिसमस कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार होती. मात्र प्रकृतीचं कारण देत तिने कॉन्सर्ट रद्द केला होता.
मुनव्वर फारुकीच्या मुलाला झालाय ‘हा’ गंभीर आजार, अभिनेत्याने सांगितला कठीण काळातला किस्सा
१९८० आणि ९० च्या दशकात नाकायामा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, ती १९९५ मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह लेटर’ चित्रपटातील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. ती ‘टोक्यो वेदर’ (1997) सारख्या चित्रपटातही दिसली होती. जपानमधील साकूमध्ये जन्मलेल्या नाकायामाने १९८५ मध्ये ‘मैदो ओसावागासे शिमासू’ नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या नाटकाने तिला लवकर प्रसिद्धी मिळवून दिली. त्याच वर्षी तिने तिचे ‘सी’ हे पहिले गाणेही रिलीज केले. नाकायामाने ‘बी-बॉप हायस्कूल’ मध्ये अभिनय केला आणि जपानमध्ये स्वतःचा अल्बम रिलीज केला.
अखेर शशांक केतकरच्या प्रयत्नांना यश, BMC ला धन्यवाद तर दिले पण मारला एक पुणेरी टोमणा!
नाकायमाने तिच्या संपूर्ण फिल्मी करियरमध्ये जपानमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक ती ठरली. जी चित्रपट, टेलिव्हिजन आणि म्युझिक इंडस्ट्रीतील तिच्या कामगिरीसाठी ओळखली जाते. ‘लव्ह लेटर’ मधील तिच्या अभिनयाने तिला ब्लू रिबन अवॉर्ड्स आणि होची फिल्म अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचाही पुरस्कार मिळाला, तर या चित्रपटाने टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही पुरस्कार जिंकले. नाकायामा यांच्या पश्चात फक्त त्यांचा मुलगा आहे.