मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कॉमेडी शो मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे (Madness Machayenge – India Ko Hasayenge) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या वीकएंडला आगामी एपिसोड हा ‘जोडी स्पेशल’ एपिसोडमध्ये या शोमधले विनोदवीर एकत्र टीम बनवून खूप धमाल उडवतील आणि शोमध्ये जल्लोष करतील, अगदी आवर्जून पहावा असा हा एपिसोड असणार आहे.
[read_also content=”प्रसाद ओकची बॉलीवूडमध्ये एन्ट्री, मौनी रॉयसह करणार स्क्रीन शेअर ! https://www.navarashtra.com/movies/prasad-oaks-entry-in-bollywood-will-share-the-screen-with-mouni-roy-540422.html”]
विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike), सागर कारंडे (Sagar Karande) आणि कावेरी प्रियम (Kaveri Priyam) ‘सीनियर सिटिझन क्लास’ या अॅक्टसाठी जोमाने एकत्र येत आहेत. या धमाल स्किटमध्ये कुशल आणि सागर यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांची भूमिका साकारली आहे, त्यांनी स्वतः शाळेत प्रवेश घेतला आहे, जे त्यांची शिक्षिका बनलेल्या कावेरीला पसंत नाही. कुशलचे पात्र सतत काही वाक्ये फेकत असते तर सागरचे पात्र अगदी साध्या प्रश्नांचीही खुमासदार उत्तरे देऊन वर्गात हशा पिकवून व्यत्यय आणते. कावेरी वर्गात शिस्त राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते, परंतु कुशलच्या अतिशयोक्तीच्या वाक्यांनी आणि सागरच्या आचरटपणापुढे ती हात टेकते आणि पळ काढते. हे पाहताना प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होते.
आगामी अॅक्टसंदर्भात काय म्हणाला कुशल बद्रिके
आपल्या आगामी अॅक्टविषयी बोलताना कुशल बद्रिके म्हणतो, “आमच्या आगामी स्किटसाठी आम्ही आमच्या अॅक्टमध्ये नाविन्याची जोड देण्यावर भर दिला होता आणि ते खूपच चांगले जमले. सागर आणि प्रियम अतिशय प्रतिभावान आहेत आणि त्यांचे विनोदाचे टाइमिंग कमाल आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला धमाल आली आणि अॅक्टला एक नवी उंची मिळाली. प्रेक्षकांना आमचा अॅक्ट आवडेल अशी मला आशा आहे.”
[read_also content=”सान्या मल्होत्रा पुन्हा चमकली ‘मिसेस’साठी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन https://www.navarashtra.com/movies/sanya-malhotra-shines-again-for-mrs-nominated-for-best-actress-at-new-york-indian-film-festival-540449.html”]
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरचा कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या वीकएंडला रात्री 9:30 वाजता त्यांचे नवे भाग प्रदर्शित होतात. या शोमध्ये हुमा खुरेशी, स्नेहिल, अंकिता श्रीवास्तव, परितोष त्रिपाठी, कुशल बद्रिके, इंदर साहनी, गौरव दुबे आणि केतन सिंग त्याचबरोबर हर्ष गुजराल हा सूत्रसंचालक आहे. सध्या शो ची सोशल मिडीयावर बरीच चर्चा सुरु आहे.