Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाशिवरात्रीनिमित्त ‘इंद्रायणी’ आणि ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकांचे विशेष भाग

कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' आणि '#लय आवडतेस तू मला' मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग 'कलर्स मराठी'वर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. या दोन्हीही मालिकेंत महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कथानकात नवे वळण पाहायला मिळणार आहे

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 24, 2025 | 07:50 PM
महाशिवरात्रीनिमित्त 'इंद्रायणी' आणि '#लय आवडतेस तू मला' मालिकांचे विशेष भाग

महाशिवरात्रीनिमित्त 'इंद्रायणी' आणि '#लय आवडतेस तू मला' मालिकांचे विशेष भाग

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील इंद्रायणी आणि #लय आवडतेस तू मला मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग २६ फेब्रुवारी संध्या. ७.०० आणि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. ‘इंद्रायणी’ मालिकेत महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कथानकात नवे वळण येणार आहे.

इंद्रायणीचे काका-काकू खरे नसून ते फसवे असल्याचे समजताच ते इंदूला धमकी देतात की, जर तिने हे सत्य कोणालाही सांगितले तर अधूच्या जीवाला धोका होईल. यामुळे इंद्रायणी संभ्रमात पडते आणि या परिस्थितीत इंद्रायणी गुप्तपणे गोपाळला सत्य कळवण्याची योजना आखते. महाशिवरात्रीचा दिवस उगवतो. इंदूला काका-काकूंकडून महाशिवरात्रीच्या कीर्तनाची परवानगी मिळते. कीर्तनाच्या वेळी ती ‘पुत्रणा मावशीचे कीर्तन’ सादर करत असताना गोपाळला काका-काकू खरे नसल्याचे संकेत देते. आता यामुळे इंद्रायणी खोड्या काका – काकूंचा पर्दाफाश कशी करणार ? याची उत्सुकता वाढली आहे.

“…जोवर मी शाहरुख खान बनत नाही तोवर…”, अभिनयाच्या जोरावर स्टार का होता आलं नाही? अक्षय खन्नाने केला खुलासा

# लय आवडतेस तू मला मालिकेत सरकार – सानिकाचा कळशी गावातील गावकऱ्यांसोबतच लढा सुरुच आहे. साहेबरावांनी साखर कारखाना बंद केल्यानंतर कळशीगाव बेरोजगारीसाठी सानिका आणि सरकारला जबाबदार धरतं. मात्र, या विरोधातही सानिका हार मानत नाही. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ती एक नवा मार्ग शोधते आणि तो म्हणजे ‘चहाचा गूळ’ तयार करण्याचा. मात्र, गावकरी तिच्या कल्पनेला अशक्य मानून तिची खिल्ली उडवतात. सानिका आव्हान स्वीकारून स्वतः गूळ बनवून दाखवण्याचा निर्धार करते.

दरम्यान, सरकारदेखील महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कठोर व्रत करताना दिसणार आहे. सानिकाच्या अथक प्रयत्नांना यश मिळावे, म्हणून सरकार प्राचीन महादेव मंदिरातील शिवलिंगावर 101 वेळा नदीचे पाणी वाहण्याचा संकल्प करतो. एकीकडे सानिका गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि बेरोजगारी मिटवण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे सरकार तिला यश मिळावे यासाठी झुंजतो आहे. एकाला यश पाहिजे, तर दुसऱ्याला देवाचा आशीर्वाद.

रणवीर अल्लाहबादियासह आशिष चंचलानी अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलसमोर चौकशीसाठी हजर!

आता बघूया पुढे मालिकेत काय घडणार ? महादेवाच्या आशीर्वादाने सानिका – सरकार कसे हे आव्हानं पार करणार. यावर बोलताना तन्मय जक्का म्हणाला, “हा सीन चित्रीत करताना खूप आव्हानात्मक अनुभव होता. रणरणत्या उन्हात आम्ही हा सिन शूट केला… जवळपास ३-४ तास लागले, तीव्र उन्हामुळे चटके तर लागतच होते पण पाय खरंच पोळले होते आणि १०१ फेऱ्या पूर्ण केल्यासारखं वाटलं. पण त्यानिमित्ताने महादेवाची सेवा करण्याची संधी मिळाली, हे विशेष वाटतं. दरम्यान, उष्णतेमुळे थोडं कठीण झालं पण टीमने त्वरित काळजी घेतली. अशा सीनसाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो, कारण शारीरिक आणि मानसिक तग धरावा लागतो,”

हे जाणून घेण्यासाठी पहा इंद्रायणी आणि #लय आवडतेस तू मला मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग २६ फेब्रुवारी संध्या. ७.०० आणि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर

Web Title: Interesting twist in lai aavadtes tu mala sarkar will observe strict fast to obtain the blessings of lord mahadev

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • colors marathi
  • colrs marathi serials
  • Entertainment News
  • marathi serial update
  • Television Shows

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
1

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
2

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास
3

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त
4

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.