सौजन्य- सोशल मीडिया
Mariah Carey Mother and Sister Passed Away : आंतरराष्ट्रीय गायिका मारिया कॅरीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीने एकाच दिवशी आपल्या आईला आणि बहिणीलाही गमावलं आहे. एकाच दिवशी आई पॅट्रिशिया आणि बहिण ॲलिसन यांचे निधन झाले आहे. एकाच दिवशी कुटुंबीयांतल्या दोन सदस्याचे निधन झाल्यामुळे अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पीपल वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मारियाने दु:खद घटनेचा उल्लेख केला आहे. ती म्हणाली, “माझ्यासाठी गेल्या आठवड्याचा शेवट खूप वाईट पद्धतीने झाला. एकाच दिवशी माझ्या आईचे आणि बहिणीचे निधन झाले. दोघींचंही एकाच दिवशी निधन झाल्यामुळे मी खूपच दु:खी आहे. ” मात्र, आईचे आणि बहिणीचे निधन कसा झाले याबाबत मारियाने माहिती दिली नाही.
अखेरच्या क्षणी अभिनेत्री आपल्या आईसोबत असल्यामुळे ती फारच दु:खी आहे. मुलाखतीत पुढे मारिया म्हणाली, “मी सर्वांच्या प्रेमाचा आणि समर्थनाचा आदर करते. शिवाय या कठीण काळात माझ्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.’ पॅट्रिशिया, ज्युलिअर्ड- ऑपेरा गायक आणि प्रशिक्षक होत्या. त्यांनी अल्फ्रेड रॉय कॅरी यांच्यासोबत लग्न केले होते. पॅट्रशिया आणि अल्फ्रेड यांना एलिसन, मारिया आणि मॉर्गन अशा तीन मुली होत्या. मारिया आणि तिच्या बहिणी खूप लहान असतानाच आईचा आणि वडिलांचा घटस्फोट झाला होता.
मारियाने अनेकदा सांगितले आहे की तिचे तिच्या आईसोबतचे नाते व्यवस्थित नव्हते. २०२० मध्ये रिलीज झालेल्या ‘द मीनिंग ऑफ मारिया कॅरी’ या ऑटोबायग्रॉफीमध्ये मारियाने तिच्या आईसोबतच्या नातेसंबंधाबद्दल सांगितले आहे. शिवाय तिने पुस्तकात आपले आयुष्यही आपल्या आईच्या आयुष्याप्रमाणेच असल्याचे सांगितले. माझे आयुष्य रेनबोप्रमाणेच आहे, असं मारियाने सांगितले होते. मारियाने सांगितले की, माझं आणि आईचं जरीही नातं व्यवस्थित नसलं तरीही आम्ही दोघीही मनाने एकमेकांच्या फार जवळ होतो आणि पुढेही राहू. नात्यात कितीही चढउतार आले तरी मी आईसोबतचे नाते शेवटपर्यंत खूप घट्ट ठेवले आहेत.
हे देखील वाचा – दिशाचा खोटा चेहरा की प्रीतमचं खरं प्रेम…; कोण जिंकेल प्रेमाची लढाई?