बॉलिवूड सोबतच हॉलिवूड मध्येही लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा नवरा सुप्रसिद्ध गायक निक जोन्स (Nick Jonas) हे दोघे त्यांचे स्टाईल स्टेटमेंट, कपल गोल्स इत्यादींमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र प्रियांकाचा नवरा निक जॉन्स आता एका नव्या कारणाने पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
निकची एक्स गर्लफ्रेंड सेलेना गोमेझ (Selena Gomez) हिने एका मुलाखतीत निक हा ‘गे’ (Gay) असल्याचे म्हंटले आहे. तिने निकच्या सेक्सुअॅलिटी आयडेंटीवर आरोप केले असून तिच्या या आरोपामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
हॉलीवूडमध्ये (Hollywood) निकचा चाहतावर्ग मोठा आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असणारा कलाकार असून प्रियंकाशी लग्न करण्यापूर्वी निकने अनेकांना डेट केल्याच्या बातम्या यापूर्वी व्हायरल झाल्या होत्या. यासगळ्यात निक ची एक्स गर्लफेंड सेरेनाने एक धक्कादायक खुलासा करुन मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका मुलाखतीमध्ये सेलेनाला निकच्या सेक्सुअॅलिटीवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सेलेनाने म्हटले होते की, निक हा ‘गे’ आहे. सेलेना आणि निक यांचं अफेयर हे काही बराचकाळ चाललं नाही. ते एकमेकांना डेट करत होते. मात्र काही कारणास्तव त्यांच्यातील नातं संपलं. पुढे निकनं प्रियंकाला डेट करत तिच्याशी लग्न केलं.
गायक असणाऱ्या निकच्या आयुष्यात अनेक मुली आल्या असं सांगितलं जातं, मात्र सध्या निक आणि प्रियांका त्यांच्या आयुष्यात आलेल्या नव्या पाहुण्याच्या आगमनाने खूप आनंदी आहेत. निक सध्या वडिलांच्या भूमिकेत असून प्रियंका आणि निकला मालती नावाची मुलगी आहे. प्रियंकानं सरोगसीच्या माध्यमातून मालतीला जन्म दिल्याचे सांगितले जाते. सेरेनाने निक जॉन्सच्या सेक्सुअॅलिटी संदर्भात केलेल्या दाव्यामुळे सोशल मीडियावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.