टायटॅनिक (Titanic) जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेलेली टायटन ही बेपत्ता झालेली पाणबुडी अखेर चार दिवसांनी सापडली. मात्र, त्यातील पाचही अभ्यासकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने,या पाणबुडीचा संपर्क तुटला आणि ती बेपत्ता झाली होती. शोधमोहिमेत त्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. या दुर्घटनेवर ‘टायटॅनिक’ चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही कधीही न विसरता येणारी भयंकर दुर्घटना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Titan)
जेम्स कॅमेरून म्हणाले, ‘पीडितांच्या कुटुंबियांना काय त्रास होत असेल याची मी कल्पना करू शकत नाही. गेल्या ४ दिवसांपासून त्या लोकांना खोटी आशा दिली जात होती. पीडितांच्या कुटुंबीयांसाठी ही परिस्थिती खूप भयंकर आहे आणि ही घटना पुढची कित्येक वर्षे विसरता येणार नाही. खोल समुद्रात शोध घेणाऱ्या इंजिनिअरिंग फिल्डमधील लोकांनीही कंपनीला पत्र लिहून ही पाणबुडी प्रवाशांना वाहून नेण्यास योग्य नसल्याचा इशारा दिला होता. या पाणबुडीची आणखी तपासणी करणं आवश्यक होतं,” असंही कॅमेरून म्हणाले.
[read_also content=”‘टायटनिक जहाज दुर्घटनेतल्या मृत्याम्यांनी घेतला पर्यटकांचा बळी’, पाणबुडी दुर्घटनेनंतर काय चर्चा? टायटानिक जहाजाचे अवशेष भयावह? https://www.navarashtra.com/world/how-scary-is-the-wreck-of-the-titanic-what-are-the-experiences-of-previous-tourists-nrps-421600/”]
या घटनेत जीव गमावणारे पॉल-हेन्री नार्गोलेट हे जेम्स कॅमेरून यांचे खूप चांगले मित्र होते. दोघांची 25 वर्षांची मैत्री होती.
समुद्रात 112 पूर्वी घडलेल्या टायटॅनिक दुर्घटनेची आठवण करून देताना जेम्स कॅमेरून म्हणाले, “या घटनेने पुन्हा एकदा टायटॅनिकच्या दुर्घटनेची आठवण झाली”