बहिणीच्या लग्नात जुनैद मंडपाबाहेर बसला होता ? स्वत: आमिर खानच्या लेकाने केला खुलासा
सध्या आमिर खानचा मुलगा जुनैद खान त्याच्या ‘लव्हयाप्पा’ ह्या चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे. येत्या ७ फेब्रुवारीला जुनैद खानचा आणि खुशी कपूर स्टारर ‘लव्हयाप्पा’ चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट जुनैद आणि खुशीचाही पहिला थिएटरमध्ये रिलीज होणारा चित्रपट आहे. सध्या जुनैद त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एका मुलाखतीत जुनैदने सांगितलं की, त्याची लहान बहीण आयरा खानच्या लग्नात त्याला मोठा भाऊ असला तरी कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्याला पार्ट्यांमध्ये जाणं आवडत नाही, त्यामुळे बहिणीच्या लग्नातही बाहेर वेळ घालवल्याचं जुनैदने नमूद केलं.
Akshay Kumar मालामाल, दुप्पट किंमतीत विकला मुंबईतला फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क…
नुकतंच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जुनैदने सांगितलं की, मला पार्ट्या करायला आवडत नाही. शिवाय, जास्त लोकं असणाऱ्या पार्ट्या आणि मोठ्या आवाजात वाजणारं म्युझिक त्याला आवडत नसल्याचा खुलासाही त्याने केला आहे. त्यासोबतच माझी बहिण आयरा हिच्या लग्नानंतर मला वडील म्हणाले की, तू कधी लग्न करण्याचा विचार केलास तर पळून जा. आयराच्या लग्नावेळी माझ्याकडे कोणतंही काम नसल्यामुळे मी स्वत:ला काहीही कामाचा समजत नाही, असा समजत होतो. दरम्यान, जुनैदची बहिण आयरा हिचं लग्न जानेवारी २०२४ मध्ये जिम ट्रेनर नुपूर शिखरे ह्याच्यासोबत झालं होतं. बहिणीच्या लग्नात त्याच्याकडे कोणतीही जबाबदारी नव्हती, असा खुलासा मुलाखतीत केला.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जुनैदने सांगितलं की, “आयराला हे चांगलंच माहिती होतं की, कोणालाही माझाकडून कोणत्याही कामाची अपेक्षा नव्हती, त्यामुळे मला कोणीच काम सांगितलं नाही आणि माझ्यासोबत कामाबद्दल कोणती चर्चाही केली नाही. मला फक्त तारीख आणि वेळ सांगितली गेली आणि तिथे वेळेत पोहोचायला सांगितलं होकं. त्यांचं म्हणणं असं होतं की मला काहीही काम सांगून फायदा नाही.” तो कौटुंबिक निर्णयांमध्ये भाग घेतो की तिथेही कुचकामी आहे? यावर जुनैद म्हणाला, “मी खरंच बेकार व्यक्ती आहे. माझ्या फॅमिलीतले लोकं मला सामील करून घेण्याचा खूप प्रयत्न करतात पण मी खूप कुचकामी आहे.” जुनैदने सांगितले की, घरी वडील जेव्हा पार्टी ठेवतात, तेव्हा तो बाल्कनीत बसतो.
जुनैदने सांगितलं की, मला जास्त व्यक्ती असलेल्या ठिकाणी जायला आवडत नाही, त्यामुळे मी पार्ट्यांमध्ये न जाता बाहेर बसणंच पसंत करतो. पुढे जुनैदने सांगितलं की, “मी आयराच्याही लग्नात बाहेरच होतो.” जुनैदने बाहेर आपला वेळ कसा घालवला हे विचारल्यावर त्याने सांगितलं की, “मी बाहेर काही लोकांसोबत आणि काही समविचारी लोकांबरोबर बसलो होतो.” दरम्यान, जुनैद खानचा दुसरा चित्रपट ‘लवयापा’ येत्या ७ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात खुशी कपूरही त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याचे दिग्दर्शन अद्वैत चंदनने केले आहे. जुनैद खानचा पहिला चित्रपट ‘महाराज’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता.