(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
आर माधवन हा एक असा अभिनेता आहे जो पात्रांच्या आत शिरू शकतो. सध्या तो ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘हिसाब बरोबर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच या अभिनेत्याने चित्रपट हिट किंवा फ्लॉप होण्याबद्दल आपले मत स्पष्ट मांडले आहेत. त्यांनी त्यांच्या ‘रहना है तेरे दिल में’ या कल्ट चित्रपटाबद्दलच्या आठवणींनाही उजाळा दिला. अभिनेता कल्ट चित्रपटांच्या पुनर्प्रदर्शनवर काय म्हणाला आपण हे आता जाणून घेणार आहोत.
चित्रपटाने पहिल्या दिवशी खळबळ उडवली की झाला फ्लॉप? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन!
चांगले कलाकार असतील तरच चित्रपट हिट होतोच
आर माधवन यांनी अलीकडेच चित्रपटांच्या यश आणि अपयशाबद्दल सांगितले आहे. चांगले कलाकार नसल्यास ब्लॉकबस्टर प्रमोशन देखील चित्रपटाच्या फायद्यात येणार नाही असे अभिनेत्याचे म्हणणे आहे. चित्रपट कितीही मोठा असो वा छोटा, फक्त कलाकारांचा अभिनय महत्त्वाचा असतो. पीटीआयशी बोलताना माधवन म्हणतो, ‘जर तुमच्या चित्रपटात असे कलाकार नसतील जे पात्रात पूर्णपणे शिरू शकतील आणि त्यांचे संवाद चांगल्या प्रकारे मांडू शकतील, तर प्रेक्षक तुमचा चित्रपट पाहणार नाहीत.’ ते पुढे म्हणाले, ‘असे मानले जाते की मोठ्या प्रमाणात मनोरंजन चित्रपट, विशेषतः दक्षिण भारतीय चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहेत. पण मोठ्या स्टार्सशिवायही अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले आहे.’ असे अभिनेत्याने सांगितले आहे.
‘मुंज्या’ चित्रपटाचे कौतुक झाले
माधवन पुढे म्हणाले की, ‘मुंज्या’ सारख्या छोट्या चित्रपटांनी खूप चांगले कलेक्शन केले आहे. लोकांनी असे चित्रपट पाहिले आहेत. त्याच वेळी, अनेक मोठे चित्रपट फ्लॉप झाले. चांगली कथा, पात्रे आणि उत्तम कलाकार यामुळे चित्रपट हिट होतो असे मला वाटते.’ असे अभिनेत्याने सांगितले आहे.
कल्ट चित्रपटांच्या पुनर्प्रदर्शनाबद्दल काय म्हणाला अभिनेता
आर माधवनचा २००१ मध्ये आलेला ‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा थिएटरमध्ये चांगला चालला नाही. नंतर, ‘रहना है तेरे दिल में’ टीव्हीवर आला आणि एक कल्ट चित्रपट बनला. या चित्रपटांबद्दल माधवन म्हणतो, “जेव्हा ‘रहना है तेरे दिल में’ पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा तो चांगला चालला नाही. यावेळी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट आवडला कारण मोठा प्रेक्षक आधीच त्याच्याशी जोडलेला होता. हा चित्रपट पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.” ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटात दिया मिर्झा माधवनच्या अपोझिट होती. गेल्या एका वर्षात ‘लैला मजनू’, ‘रॉकस्टार’, ‘करण अर्जुन’, ‘तुंबाड’ आणि ‘कहो ना प्यार है’ सारखे चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाले आहेत.