फोटो सौजन्य - social media
नाग अश्विनद्वारा दिग्दर्शित ‘कल्कि २८९८ एडी’ बॉक्स ऑफिसवर कमालची खेळी खेळत आहे. भारतात ‘कल्कि २८९८ एडी’ ने अक्षरशः धुमाकूळ घातले आहे. २७ जूनला जगभरात सर्वत्र प्रदर्शित झालेला चित्रपट ‘कल्कि २८९८ एडी’ आता ५०० कोटींच्या उंबरठ्यावर आहे. भारतीयांमध्ये ‘कल्कि 2898 एडी’ चा क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण चित्रपट पाहण्यास आतुर आहेत तर अनेकांनी अनेकदा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. यातील कलाकारांच्या अभिनयाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘कल्कि 2898 एडी’ एक साय फाय मूवी आहे, ज्याचे नाव हिंन्दू धर्मानुसार विष्णूच्या कलियुगातील कल्की अवताराशी प्रेरित आहे.
‘कल्कि 2898 एडी’ च्या टीझरपासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली होती. त्या उत्सुकाचे प्रमाण किती असेल याचा अंदाजा यावरूनच येईल कि ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाने पठान, सालार, साहो, दंगल आणि बाहुबलीसारख्या हिट चित्रपटांना मागे सोडले आहे. लवकरच ‘कल्कि 2898 एडी’ गदर २ सिनेमालाही मागे टाकेल अशी स्थिती दिसून येत आहे. सिनेमाने रिलीज होण्याच्या दुसऱ्या शुक्रवारी १६.७ कोटींची कमाई केली होती, जी या १० दिवसांमधील सगळ्यात कमी कमाई आहे. आतापर्यंत ‘कल्कि 2898 एडी’ ने भारतात ४६६ कोटींचा उच्चांक गाठला आहे. तर जगभरात ७०० कोटीहून जास्तीची कमाई चित्रपटाने केली आहे. ‘कल्कि 2898 एडी’ चा एकूण बजेट ६०० कोटी होता.
चित्रपट सुपरहिट ठरण्यामागचा मुख्य कारण चित्रपटाचा स्टारकास्टही सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत तर दिशा पटानी आणि कमल हसन सुद्धा आहेत. चित्रपटात दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन महाभारतातील पराक्रमी योद्धा आणि शिवसंभूचा अंश असलेल्या अश्वत्थामाचे पात्र निभावत आहेत. तसेच सिनेमाचे क्वालिटी ग्राफिक्सदेखील सिनेमाच्या यशाचे कारण बनले आहे.