Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली खिल्ली!
सोशल मीडियावर कायमच जगप्रसिद्ध ब्रँड प्रादाची कायमच चर्चा असते. हा एक लोकप्रिय ब्रँड आहे. प्रादा कायमच त्यांच्या चप्पला आणि बॅगमध्ये काहींना काही नवीन डिझाईन तयार करत असतात. सोशल मीडियावर प्रादाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. प्रादाने नुकतीच टोट बॅग लाँच केली आहे. या टोट बँगची किंमत सुमारे २.७३ लाख रुपये आहे. यातील मनोरंजक गोष्ट म्हणजे प्रादाने लाँच केलेली बॅग भारतीय ट्रेनच्या फरशीसारखी दिसून आली आहे. या बॅगचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेटकऱ्यांनी प्रादाची चांगलीच खिल्ली उडवली आहे. तसेच इंटरनेटवर मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत. तसेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत म्हंटले आहे की, प्रादा ही त्या माजी प्रियकरासारखी आहे ज्याला भारत खूप आवडतो.’ काही काळापूर्वी प्रादाच्या कोल्हापुरी चप्पलवरून वाद झाला होता. आता हा ब्रँड पुन्हा एकदा त्याच्या नवीन बॅगसह चर्चेत आला आहे तेव्हा तो वाद शांत झाला होता.
प्रादाने लाँच केलेल्या नवीन बॅगवर भारतीय फरशांची डिझाईन आहे. आकाराने अतिशय लहान असलेल्या टोट बॅगची किंमत ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच या टोट बॅगवर मेटॅलिक डिझाइन आणि हॉट-स्टॅम्प्ड लेदर डिटेलिंग करत इंडस्ट्रियल लूक देण्यात आला आहे. याशिवाय बॅगमध्ये पाण्याच्या बाटलीसाठी वेगळा कप्पा देण्यात आला आहे. प्रादाच्या स्टायलिश बॅगने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय लोकल ट्रेनच्या फरशीसारखी दिसणाऱ्या बॅगची किंमत २.७३ लाख आहे.
काही दिवसांपूर्वी प्रादाने मिलानमधील फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल परिधान केल्या होत्या. हा प्राडाच्या स्प्रिंग/समर २०२६ च्या पुरुषांच्या कपड्यांच्या संग्रहाचा भाग होता, जो मियुसिया प्राडा आणि रॅफ सिमन्स यांनी डिझाईन केला होता. प्रादाच्या फॅशन शोमध्ये दिसून आलेल्या कोल्हापुरी चप्पलांवरून वाद निर्माण झाला होता. या फॅशन शोमध्ये त्यांनी स्वच्छ कापसाचे शर्ट आणि रंगीबेरंगी टोप्या आणि हाताने बनवलेल्या कोल्हापुरी चप्पला परिधान केल्या होत्या. भारताच्या पारंपारिक कोल्हापुरी चप्पलांपासून तयार करण्यात आलेल्या चपला पाहून नेटकरी चांगलेच संतापले होते. त्यानंतर प्रादाने सांगितले की भारतीय कोल्हापुरी चपलांपासून प्रेरणा घेत मिलान शोमध्ये चपला तयार केल्या होत्या.