सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार चित्रपट येत आहेत, या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. आता ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे आणि त्यासोबतच ओटीटीवर रिलीज होणाऱ्या शोची यादीही आली आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला काहीतरी मनोरंजक रिलीज केले जाते. या आठवड्यातही ओटीटीवर येणाऱ्या कंटेंटचा बॉक्स काही कमी नाही. या आठवड्यामध्ये कोणत्या मालिका आणि सिनेमे ओटीटीवर येणार आहेत, यावर एकदा नजर टाका.
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मानवत मर्डर्स - सोनी लिव्ह एक मनोरंजक क्राईम थ्रिलर मालिका 'मानवत मर्डर्स' घेऊन येत आहे. या मालिकेत 70 च्या दशकात देशाला हादरवून सोडणाऱ्या अत्यंत भयानक घटना दाखवण्यात येणार आहेत.
लव्ह सितारा - नागा चैतन्यसोबत शोभिता धुलिपालाच्या लग्नानंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची कथा इंटिरियर डिझायनर तारा आणि शेफ अर्जुन यांच्यावर आधारित आहे. 27 सप्टेंबर रोजी हा झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.
ताजा खबर २ - भुवन बामच्या 'ताजा खबर' या वेबसिरीजचा दुसरा सीझनही याच आठवड्यात सुरू होत आहे. या मालिकेचा पहिला सिझन प्रचंड गाजला आहे. ही नवी मालिका 27 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
इनसाइड आउट 2 - हा एक लोकप्रिय ॲनिमेटेड चित्रपट आहे, जो OTT वर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. अनेक दिवसांपासून इनसाइड आऊट २ ची चर्चा होती आणि आता हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा 25 सप्टेंबर रोजी ओटीटीवर डिस्ने प्लस हॉटस्टार येणार आहे.
एलेन डीजेनेरेस: फॉर युवर अप्रूव्हल - 'द एलेन शो'ची लोकप्रिय होस्ट एलेन डीजेनेरेस पुन्हा एकदा कॉमेडियन म्हणून परतताना दिसणार आहे. तिच्या शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा शो 24 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
वाझा : बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज - हा एक मल्याळम चित्रपट आहे, ज्यामध्ये चार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट २३ सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार प्रदर्शित होणार आहे.