भारतातील अग्रगण्य मेन्स फ्रॅगरन्स ब्रॅंड डेन्व्हरने सुपरस्टार महेश बाबूसोबत हातमिळवणी करत एक नवं प्रीमियम कलेक्शन बाजारात आणलं आहे. ऑटोग्राफ एमबी कलेक्शन नावाच्या या यु डी पर्फ्यूम्सच्या श्रेणीत महेश बाबूची स्टाईल, व्यक्तिमत्व आणि त्यांचा सुसंस्कृत अंदाज झळकतो. या कलेक्शनच्या प्रमोशनसाठी एक खास ब्रॅंड फिल्मही प्रदर्शित करण्यात आली असून, स्वतः महेश बाबू आपल्या आवाजातून या श्रेणीचा अनुभव चाहत्यांना करून देतात.
या खास कलेक्शनमध्ये मंडे मॅग्नेट, सॅटर्डे सनसेट आणि विकेड वेनसडे हे लिमिटेड एडिशन परफ्यूम्स समाविष्ट आहेत. प्रत्येक सुगंध हा कलात्मकतेचा आणि लक्झरीचा संगम आहे. त्यामुळे उत्कृष्टता शोधणाऱ्या पुरुषांसाठी हे कलेक्शन एक आगळावेगळं ऑफरिंग ठरणार आहे.
एचएसपीएलचे एमडी आणि सीईओ सौरभ गुप्ता यांनी सांगितले की, “आम्ही जेव्हा आमच्या मागच्या शूटच्या वेळेस महेश सरांना भेटलो, तेव्हा मी ही कल्पना मनातून काढून टाकली होती. ते अचूकतेचे भोक्ते आहेत, मनावर राज्य करणारे राजकुमार आहेत- विनम्र, साधे पण महान आहेत आणि सतत सुपरहिट्स देत आहेत. त्यांची ही सिद्धी साजरी व्हायला हवी असे वाटले. एक फ्रॅगरन्स ब्रॅंड म्हणून ‘ऑटोग्राफ कलेक्शन ब्रॅंड’ त्यासाठी आम्हाला सुयोग्य वाटला. पण आम्हाला तो आणखी उन्नत करण्याची इच्छा होती. ही श्रेणी महेश सरांच्या प्रवासाचे प्रतिबिंब दर्शवते- जेथे एक साधीशी सही ऑटोग्राफ होऊन जाते! ही श्रेणी यश, आकांक्षा आणि लक्झरीचे प्रतीक आहे.”
दरम्यान, सुपरस्टार महेश बाबू म्हणाले, “मी २०१८ पासून डेन्व्हरशी जोडलेलो आहे. प्रत्येक वेळी ते वेगळं काहीतरी घेऊन येतात. एक प्रतिष्ठित कलेक्शनची सह-निर्मिती करून ते लॉन्च करणं माझ्यासाठी रोमांचक होतं. डेन्व्हरने लक्झरीला नवा आयाम दिला आहे, पण त्याचबरोबर उत्पादने सहज उपलब्ध ठेवली आहेत. ऑटोग्राफ एमबी कलेक्शन ज्या पॅशनने तयार करण्यात आलं आहे, त्याच पॅशनने लोक त्याला स्वीकारतील अशी मला खात्री आहे.”
महेश बाबूने आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून या कलेक्शनचं अनावरण करत त्याला “माय साईन ऑफ सक्सेस” असं संबोधलं. या लाँचमुळे डेन्व्हरच्या प्रीमियम फ्रॅगरन्स सेगमेंटमध्ये नवा अध्याय सुरू झाला असून, स्वतःची ओळख आणि व्यक्तिमत्वाला महत्त्व देणाऱ्या पुरुषांसाठी ही श्रेणी एक वेगळा सुगंधी प्रवास ठरणार आहे.