मुंबई : ‘बिग बॉस 15’ची (Bigboss 15) विजेती ठरलेली तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हि महाराष्ट्रीन आहे. खरतर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खर आहे. तेजस्वी प्रकाशच्या मराठी कनेक्शन बद्दल बोलायचं झाल तर तेजस्वी प्रकाश हिच पूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर. एक मराठमोळ्या कुटुंबांमध्ये तिचा जन्म झाला. तिच कुटुंब म्हणजे संगीताशी जुळलेल. त्यामुळे कलेचा वारसा तिला कुटुंबांकडूनच मिळाला.
तेजस्वी प्रकाशचा जन्म 10 जून 1992 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला. तिचे वडील प्रकाश वायंगणकर आणि भाऊ प्रतिक वायंगणकर हे इंजिनिअर आहेत. शालेय शिक्षण पूर्ण करून तिने इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. [blurb content=””]. पण काही काळानंतर तेजस्विनीने आपले करिअर बदलण्याचा निर्णय घेतला.
तेजस्वी प्रकाशने अभियांत्रिकीची पदवी घेण्यासोबतच अभिनय विश्वात प्रवेश केला होता. तेजस्वी प्रकाश जेव्हा टीव्हीवर दिसली तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. तेजस्वीची पहिली मालिका ‘2612’ आहे, जी 2012 मध्ये टेलीकास्ट झाली होती.. यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली, ज्यात ‘स्वरागिनी-जोडे रिश्ते का सूर’, ‘पेहेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ सारख्या टीव्ही मालिकांचा समावेश आहे..
तेजस्वीची लव्ह लाइफ
तेजस्वी प्रकाशचे नाव टीव्हीवरील हँडसम अभिनेता शिवीन नारंगसोबत जोडले गेले होते. दोघेही ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसले होते. इतकंच नाही तर दोघांच बाँडिंग चाहत्यांना खूप आवडलं होतं. याच कारणामुळे त्यांच्या नात्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, दोघेही नेहमी स्वत:ला एकमेकांचे चांगले मित्र मानतात. तर सध्या बिग बॉसच्या घरात तेजस्वीच आणि करण कुंद्रा मध्ये हळूवार प्रेमाच नात फुलताना प्रेक्षकांनी पाहिलं.