पंढरीनाथ कांबळेसाठी अंशुमन विचारेच्या पत्नीची खास पोस्ट; म्हणाली, “त्याच्या कर्तृत्वावर आणि चांगुलपणावर...”
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, अवघ्या इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात जान्हवी किल्लेकर आणि पंढरीनाथ कांबळेमध्ये कडाक्याचे वाद झाला होता. जान्हवीने पॅडी कांबळेला त्याच्या अभिनयावरून हिणवलं होतं. यामुळे सोशल मीडियावर जान्हवीला फक्त नेटकऱ्यांनीच नाही तर अख्ख्या मराठी फिल्म इंडस्ट्रीने त्याशिवाय काही राजकीय मंडळींनी तिला ट्रोल केलं होतं.
सध्या अनेक सेलिब्रिटी पॅडी कांबळेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला पाठिंबा देत आहेत. आता दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनीही पॅडी कांबळेच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. राजेश देशपांडे यांनी पॅडीसोबतचा सेटवरील एक जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी पॅडीसोबत घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे. त्यासोबतच पॅडीला पाठिंबाही दिला आहे.
हे देखील वाचा – अंकिता- विकीच्या घरी हलणार पाळणा ? मित्रानेच दिली हिंट
दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी पॅडी कांबळेसाठी लिहिलेली पोस्ट
“आमचा पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे उर्फ छू.. खऱ्या अर्थाने हाडाचा कलावंत. काही वर्षांपूर्वी तो लोकल ट्रेनमधून फर्स्ट क्लासमधून प्रवास करायचा… तेव्हा त्याला पांढर कपडी अत्तरधारी फर्स्ट क्लासी लोक “अरे ये फर्स्ट क्लास है, नीचे उतरो” म्हणून अपमानित करायचे. त्यांना काय माहीत हा कोण आहे तो? तेव्हा पॅडीला मी एक सल्ला दिला होता की असं पुन्हा कुणी बोलले तर त्याला जबाब दे “ये फर्स्ट क्लास है? तो फिर आप यहां क्या कर रहें हो? आणि पॅडी माझ्या गंगुबाई मधील संवादाप्रमाणे हा पण संवाद वापरू लागला. त्यातून तो ट्रेनच्या डब्यात पण हशा मिळवू लागला. आताही मी त्याला हाच सल्ला देईन की तिथे एवढंच बोल “आप यहां क्या कर रहें है?” #supporttopaddykamble असा टॅग देत राजेश देशपांडे यांनी पोस्ट शेअर केली आहे.
बिग बॉसच्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क पार पडला. या टास्क दरम्यान, जान्हवी किल्लेकर आणि पॅडी कांबळेमध्ये जोरदार वाद झाला. टास्क दरम्यान, जान्हवीने पॅडीचा अभिनयावरून अपमान केला आहे होता. जान्हवी म्हणाली, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याची हिंमत नाहीये. पॅडी दादांच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. बाहेर ओव्हर अॅक्टिंग करून दमले, आता ती ओव्हर अॅक्टिंग घरात दाखवतायत.” जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा केलेला अपमान ऐकून अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.
हे देखील वाचा – लग्नाआधीच Amy Jackson भावी पतीसोबत रोमँटिक झाली, लवकरच अडकणार लग्नबंधनात