Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”तेव्हाच त्या आत्म्याला घरात..”, ‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये रहस्यमय वळण; गूढ घटनांनी वाढणार रहस्य

colors marathi Serial : वल्लरीसोबत काय घडलं? वल्लरीला या अंधारातून बाहेर काढणं शक्य होणार आहे का? या सगळ्यांची उत्तरं ‘पिंगा’च्या येणाऱ्या भागांमध्ये उलगडणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 10, 2026 | 01:44 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत सतत ट्विस्ट येत असतात. 12 जानेवारीपासून या मालिकेत एक रहस्यमय वळण आल्याचे पाहायला मिळणार आहे.मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक गूढ, अस्वस्थ करणारा आणि थरारक प्रवास. मनोजच्या मावसभावाच्या लग्नासाठी वल्लरी, मनोज आणि इंदू गावाकडे जाण्याचा निर्णय घेतात. लग्नानंतर इंदू काही दिवस गावीच थांबते, तर मनोज आणि वल्लरी रात्रीचा प्रवास करून घरी परतत असतात. वाटेत एका अनोळखी ठिकाणी वल्लरीला एक लहान मुलगी एकटी, आई-वडिलांशिवाय बसलेली दिसते. तिच्याशी संवाद साधण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न करताना वल्लरी आणि ती मुलगी एकमेकींपासून दुरावतात. घरी परतल्यानंतर नेहमी वेळेवर उठणारी वल्लरी सलग अठरा तास झोपून राहते आणि इथून सुरू होतो एक गूढ असामान्य बदल.

या घटनेनंतर वल्लरीचं वागणं मनोजसाठी अधिकच गोंधळात टाकणारं ठरतं. कधी मनोजला पाहून घाबरणं, कधी मध्यरात्री एकटक पाहत बसणं, तर कधी सकाळी रात्री घडलेल्या कोणत्याही घटनेची आठवण नसणं या सगळ्यामुळे मनोज अस्वस्थ होतो. संक्रांतीच्या निमित्ताने घरात आनंदाचं वातावरण असतानाच वल्लरीला तीच लहान मुलगी पुन्हा दिसते आणि तिला चक्कर येते. याच दरम्यान श्वेताचे बाबा घरात येतात आणि वल्लरीमध्ये झालेला बदल ओळखून पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल मनोजला देतात. घराच्या उंबरठ्यावर दुष्ट शक्तींना रोखणारं तोरण लावलं जातं, आणि त्यानंतर ती मुलगी घरात प्रवेश करू शकत नाही तेव्हाच उलगडतं एक धक्कादायक सत्य की ती साधी मुलगी नसून एक आत्मा आहे.

“मागील ३ दिवस जे माझ्यासोबत घडते आहे…” अभिनेत्री अश्विनी महागंडेने पोस्ट करून व्यक्त केला अनुभव; म्हणाली, ” हे का घडते..”

घटनेचा उगम शोधण्यासाठी मनोज पुन्हा त्या जागेकडे जाण्याचा विचार करत असतानाच, एका निर्णायक रात्री वल्लरी तेजाकडे झोपायला जाते आणि तेव्हाच त्या आत्म्याला घरात शिरण्याची संधी मिळते. ती लहान मुलगी वल्लरीला मिठी मारून झोपी जाते, आणि याच क्षणी वल्लरीमध्ये एक भयानक परिवर्तन घडतं. पुढच्या दिवशी वल्लरी स्वतःला ‘जीविका जीरापुरे’ असल्याचं वैदर्भी भाषेत सांगू लागते. प्रेक्षकांसाठी हा क्षण स्पष्ट करतो की वल्लरी झपाटली गेली आहे. ही आत्मा नेमकी कोण आहे? तिचा उद्देश काय? आणि वल्लरीला या अंधारातून बाहेर काढणं शक्य होणार आहे का? या सगळ्यांची उत्तरं ‘पिंगा’च्या येणाऱ्या भागांमध्ये उलगडणार आहेत.

‘बँक अकाउंट खाली…’, माही विजने घटस्फोट आणि पोटगीवर व्यक्त केला राग, मुलांच्या संगोपनाबाबत सांगितली ‘ही’ गोष्ट

Web Title: A mysterious turn in pinga gan pori pinga a new twist unfolds in the show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • colors marathi
  • Entertainemnt News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : 11 जानेवारीला घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार
1

Bigg Boss Marathi 6 : 11 जानेवारीला घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार

“मागील ३ दिवस जे माझ्यासोबत घडते आहे…” अभिनेत्री अश्विनी महागंडेने पोस्ट करून व्यक्त केला अनुभव; म्हणाली, ” हे का घडते..”
2

“मागील ३ दिवस जे माझ्यासोबत घडते आहे…” अभिनेत्री अश्विनी महागंडेने पोस्ट करून व्यक्त केला अनुभव; म्हणाली, ” हे का घडते..”

‘बँक अकाउंट खाली…’, माही विजने घटस्फोट आणि पोटगीवर व्यक्त केला राग, मुलांच्या संगोपनाबाबत सांगितली ‘ही’ गोष्ट
3

‘बँक अकाउंट खाली…’, माही विजने घटस्फोट आणि पोटगीवर व्यक्त केला राग, मुलांच्या संगोपनाबाबत सांगितली ‘ही’ गोष्ट

बॉलिवूडच्या फॅशन क्वीननं २ तासांत बदले १३० कपडे, दिग्दर्शकांनी डिझायनर्सवर खर्च केले कोट्यवधी
4

बॉलिवूडच्या फॅशन क्वीननं २ तासांत बदले १३० कपडे, दिग्दर्शकांनी डिझायनर्सवर खर्च केले कोट्यवधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.