अभिनेत्री केतकी चितळे तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे जास्त ओळखली जाते. तसेच अभिनेत्री वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. लव्ह जिहाद, यशश्री शिंदे, मराठा आरक्षण या सगळ्या मुद्दयांवर केतकी चितळे तिचे मत स्पष्ट करताना दिसली आहे. ती नेमही या मुद्द्यांमुळे चर्चेत आली आहे. सध्या बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे त्या देशातील माजी पंतप्रधान शेख हसीना या भारतामध्ये आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. याचदरम्यान या विषयावर अभिनेत्री केतकी चितळेने निराशा व्यक्त केली आहे. याबद्दल तिने आपले मत मांडून सोशल मीडियावर एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

बांगलादेशी नागरिक आणि तेथील माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात मिळणाऱ्या आश्रयाबाबत म्हणताना अभिनेत्रीने लिहिले की, जवळपास आपण धर्मशाळा, ओह सॉरी धर्म नाही कारणं आपण धर्म म्हंटल की, हे सो कॉल्ड ‘भारतीय सो कॉल्ड अल्पसंख्याक मुसलमान’ समाज जो बिचारा भीतीच्या छत्रछायेखाली असतो नाही का; त्यामुळे धर्म नाही. “लंडनने शेख हसीनाला आश्रय नाकारला. त्यामुळे शेख हसीना येथे येतात. बांगलादेशी पाकिस्तानात जात नाहीत, जे त्यांना आपलेच वाटते.आश्रम उघडला आहे का आपण? ‘या आणि मारा आमची’ असे लिहून अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत शेख हसीना यांना केंद्र सरकारने दिलेल्या आश्रयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
या आधीही तिने निवडणुकीत भाजपला मत न मिळाल्यामुळे संताप व्यक्त करत सगळ्या हिंदू समाजाचा निषेद केला होता. अनेकांनी तिच्या या वागण्यावर टीका केली तर अनेकांनी तिचं समर्थन केले होते. तिच्या या सोशल मीडियावरील पोस्टवर देखील लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत.






