Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tighee Teaser: ‘आईचं घर हजार आठवणी’, आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा ‘तिघी’चा भावस्पर्शी टीझर प्रदर्शित

‘तिघी’ या चित्रपटाचा भावस्पर्शी टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनाला अलगद स्पर्श केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 17, 2026 | 03:51 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

आई आणि मुलींचं नातं हे केवळ रक्ताचं नसून, ते अनुभव, आठवणी, संस्कार आणि न बोललेल्या भावनांनी विणलेलं असतं. कधी अतूट जिव्हाळ्याचं, तर कधी न व्यक्त झालेल्या अपेक्षांमुळे निर्माण झालेल्या अंतराचं… तरीही अंतर्मनाने कायम एकमेकांशी घट्ट बांधलेलं. या नात्याच्या अशाच नाजूक, हळुवार आणि खोल छटा उलगडणारा ‘तिघी’ हा आगामी मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनाला अलगद स्पर्श केला आहे.

अवघ्या काही क्षणांच्या या टीझरमधून एका घरातल्या तीन स्त्रियांच्या भावविश्वाची प्रभावी झलक अनुभवायला मिळते. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील दुरावा, न बोललेल्या भावना, तणाव, आठवणी आणि तरीही त्या सगळ्याच्या पलीकडे असलेले प्रेम हे सगळं अतिशय वास्तवदर्शी पद्धतीने टीझरमध्ये मांडण्यात आलं आहे. कोणताही भडकपणा न करता, शांततेतून उलगडणाऱ्या भावनांचा हा प्रवास प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो.

‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही चित्रपटाची टॅगलाईनच त्याचा आत्मा सांगून जाते. आठवणींनी भरलेलं घर आणि त्या घरातल्या ‘तिघीं’चं अंतर्मन हा या कथेचा केंद्रबिंदू आहे. घर हे केवळ वास्तू नसून, तिथे साठलेल्या आठवणी, न बोललेले संवाद आणि मनातल्या कोपऱ्यात दडलेल्या भावना यांचं प्रतिबिंब ठरतं आणि हेच ‘तिघी’ ठळकपणे मांडतो.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, ”आई आणि मुलीचं नातं अनेकदा शब्दांपलीकडचं असतं. प्रेम व्यक्त होत नाही, ते जाणवतं. वेदना बोलल्या जात नाहीत, त्या समजल्या जातात. ‘तिघी’मधून आम्ही अशाच न बोललेल्या संवादांचा आणि न दिसणाऱ्या भावनांचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या एका कोपऱ्याला नक्कीच स्पर्श करेल.”

 

“अक्षय खन्ना 10/10 आहे, पण रणवीर 100/10”, ‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या अभिनयावर सुनील शेट्टी फिदा, म्हणाले…

या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे. आई–मुलींच्या नात्याकडे वेगळ्या, प्रगल्भ आणि संवेदनशील नजरेतून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

”महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला..”, रितेशने रूचिता जामदारला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर तन्वी पाठोपाठ रूचिताची घेतली शाळा

Web Title: Tighee movie teaser a mothers home a thousand memories revealing the delicate shades of a mother daughter bond

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi movie
  • sonalee kulkarni

संबंधित बातम्या

लहान सावित्रीने जिंकली प्रेक्षकांची मने! ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा
1

लहान सावित्रीने जिंकली प्रेक्षकांची मने! ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा

‘अगं अगं सूनबाई…’ मधील मनात साठलेल्या भावना शब्दांत सांगणारं ‘डाव मोडू नको’ ‘हे’ भावस्पर्शी गाणं प्रदर्शित
2

‘अगं अगं सूनबाई…’ मधील मनात साठलेल्या भावना शब्दांत सांगणारं ‘डाव मोडू नको’ ‘हे’ भावस्पर्शी गाणं प्रदर्शित

बॉक्स ऑफिसवर आश्चर्य! ११ दिवसांत बजेटच्या पाचपट कमाई करणारा ‘हा’ चित्रपट चर्चेत, IMDb वर 9.5 रेटिंग
3

बॉक्स ऑफिसवर आश्चर्य! ११ दिवसांत बजेटच्या पाचपट कमाई करणारा ‘हा’ चित्रपट चर्चेत, IMDb वर 9.5 रेटिंग

Kishori Shahane Car Accident: किशोरी शहाणेंच्या गाडीला धडक, अभिनेत्रीचा संताप, व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या…
4

Kishori Shahane Car Accident: किशोरी शहाणेंच्या गाडीला धडक, अभिनेत्रीचा संताप, व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.