• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Milind Gawali On Anirudhdh And Aai Kuthe Kay Karte Nrsm

पहिल्या एपिसोडपासून ६०० व्या एपिसोडपर्यंत शिव्यांचा वर्षाव होतोच आहे

मला माहिती आहे जितका माझ्यातला अनिरुद्ध राक्षस आतून बाहेर येईल तितकाच तो मला एक चांगला माणूस बनवत जाईल. कदाचित म्हणून प्राणसाहेब, अमरीशपुरी, अमजद खान , निळूभाऊ फुले ही माणसं अतिशय चांगली होती,

  • By Smita Manjrekar
Updated On: Feb 28, 2022 | 02:10 PM
पहिल्या एपिसोडपासून ६०० व्या एपिसोडपर्यंत शिव्यांचा वर्षाव होतोच आहे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kay karte) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.  या मालिकेतील अरुंधतीच्या (Arundhati) समजूतदारपणावर जेवढं प्रेक्षक प्रेम करतात तेवढाच तिरस्कार अनिरुध्दच्या आततायी स्वभावाचा करतात. अनिरुध्दच्या (Anirudhdh) स्वभावाचे अनेक पैलू अभिनेता मिलिंद गवळी यांनी मोठ्या खुबीने स्मॉल स्क्रीनवर साकारले आणि अलिकडेच या मालिकेला 600 भाग पूर्ण झाल्यामुळे मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर अनिरुध्दमुळे आलेले चांगले-वाईट अनुभव एक पोस्ट शेअर करून कथन केले आहेत.

पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेता मिलिंद गवळी यांनी लिहलं की, “६०० भाग पूर्ण झाले…”आई कुठे काय करते” या मालिकेतल्या संपूर्ण teamचं खूप खूप अभिनंदन. तुम्हा मायबाप प्रेक्षकांचे अगदी मनापासून खूप खूप आभार. प्रेक्षकांनी ही मालिका अगदी सुरुवातीपासूनच डोक्यावर घेतली, पहिल्या एपिसोडपासूनच अरुंधती देशमुख ही मनाला भावली, प्रेक्षकांच्या मनात तिने घर केलं, आणि अगदी 600 एपिसोड नंतर सुद्धा मनात रुजली, बहरली, फुलली. पहिल्याच एपिसोडमध्ये अनिरुद्ध देशमुख ती उशिरा घरी येते म्हणून तिला घराच्या बाहेर काढतो,

तो प्रसंग पाहून प्रेक्षकांबरोबर माझं स्वतः ही मन हळहळलं,मला स्वतःला अनिरुद्ध देशमुख कसा आहे तो तेव्हाच कळला. पहिल्या एपिसोड पासून ते आता 600 एपिसोडपर्यंत ह्या अनिरुद्ध देशमुख वर अक्षरश: शिव्यांचा वर्षाव झाला, झाला काय होतोच आहे”, असं मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.

“जितके लोक अरुंधती वर प्रेम करतात तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त अनिरुद्ध देशमुखचा तिरस्कार करतात.मला काय त्याचा फार आनंद होतो अशातला भाग नाहीये, वाईट वाटतं, कोणाला शिव्या खाणं आवडतं,अरुंधती बरोबर वादावादीचे भांडणाचे सीन झाल्यावर खरंच मनाला दुःख होतं, पण Somebody has to do this dirty job of playing this bloody Anirudh Deshmukh who is useless worthless talks nonsense. परत पण या ६०० एपिसोड्समध्ये अनिरुद्ध देशमुखची खूप चांगली बाजू सुध्दा प्रेक्षकांच्या समोर आली.

मुलांवरचं प्रेम, त्यांच्या भविष्याची काळजी, घर चालवण्यासाठी कष्ट करणे, आई-वडिलांवरचं प्रेम , चूक कबूल करणं, कुटुंबाला महत्व देणं,खूप अशा त्याच्या चांगल्या गोष्टी सुद्धा समोर आल्या. आई कुठे काय करतेची पटकथा नमिता वर्तक लिहिते, ती जेव्हा मला म्हणाली कि, मला तुझ्यामध्ये अनिरुद्ध दिसतो. नंतर मी आत्मपरिक्षण करायला सुरुवात केली,आणि खरंच आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माझ्यात अनिरुद्ध देशमुख कुठून कुठून भरलाय, तो मलाच कधी दिसला नव्हता, आत कुठेतरी दडून बसला होता.

हळूहळू डोकं बाहेर काढायला लागला. नमिताचे खूप आभारी, मला अनिरुद्ध दिल्या बद्दल आणि माझ्यातला अनिरुद्ध दाखवल्याबद्दल. कारण मला माहिती आहे जितका माझ्यातला अनिरुद्ध राक्षस आतून बाहेर येईल तितकाच तो मला एक चांगला माणूस बनवत जाईल. कदाचित म्हणून प्राणसाहेब, अमरीशपुरी, अमजद खान, राजशेखर , निळूभाऊ फुले ही माणसं अतिशय चांगली होती, प्रेमळ होती, सज्जन होती.त्यांच्यात आतला राक्षस पडद्यावर बाहेर आला आणि मनाने ते निर्मळ आणि स्वच्छ झाले. Anirudh Deshmukh हा Negative role जरी मी करत असलो, तरी सुद्धा माझ्यातली Positivity कधी ही कमी होणार नाही..६००च्या पुढे.”

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

Web Title: Milind gawali on anirudhdh and aai kuthe kay karte nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2022 | 02:10 PM

Topics:  

  • aai kuthe kay kart

संबंधित बातम्या

“कुठल्याच देवळात जाणार नाही असं ठरवलं पण…”, मिलिंद गवळींनी सांगितला शिर्डीच्या साई मंदिरातील अनुभव
1

“कुठल्याच देवळात जाणार नाही असं ठरवलं पण…”, मिलिंद गवळींनी सांगितला शिर्डीच्या साई मंदिरातील अनुभव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?

Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?

पाकिस्तानला मोठा झटका! तालिबानी विदेशी मंत्री येणार भारतात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी

पाकिस्तानला मोठा झटका! तालिबानी विदेशी मंत्री येणार भारतात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी

IND vs WI: भारताविरुद्ध जॉन कॅम्पबेलचा मोठा पराक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केली ‘ही’ कामगिरी

IND vs WI: भारताविरुद्ध जॉन कॅम्पबेलचा मोठा पराक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केली ‘ही’ कामगिरी

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.