US-Bangladesh Trade : अमेरिकेची बांगलादेशवर मेहरबानी; व्यापार करार करत भारताला डिवचण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि बांगलादेश व्यापार करारांतर्गत अमेरिकेने कच्चा मालापासून बनवलेल्या कापड उत्पादनांवरील शुल्क शून्य केले आहे. तर काही उत्पादनांवरील शुल्कात घट करण्यात आली आहे. यामुळे बांगालदेशच्या कापड उद्योगाला अमेरिकन बाजारात प्रवेश मिळणार आहे. मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी या करारामुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी मोठी मदत मिळेल. दोन्ही देशातीव द्विपक्षीय व्यापार करारांतर्गत अमेरिकेने बांगलादेशवरील परस्पर शुल्क देखील १९% पर्यंत कमी केले आहे. यापूर्वी ३७% कर बांगलादेशवर लावण्यात येणार होता, पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा कर २०% पर्यंत कमी झाला आणि आता पुन्हा यामध्ये मोठी सवलत देण्यात आली आहे.
अमेरिकेशी द्विपक्षीय व्यापार करार आणि कमी शुल्कामुळे बांगलादेशच्या कापड उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे बांगलादेशच्या कापड उद्योगाला अमेरिकेच्या बाजारात प्रवेश मिळणार आहे. तसेच जागतिक कापड साखळी पुरवठ्यातही बांगलादेशचे स्थान मजबूत होईल. यामुळे कापड उद्योगाची निर्यात वाढून बांगलादेशच्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. बांगलादेशचे वाणिज्य सल्लागार शेख बसी आणि सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत बांगलादेशमध्ये नॉन-टॅरिफ अडथळे कमी करण्याची सहमती दोन्ही देशांनी दिली आहे.
अमेरिका आणि बांगलादेशमधील हा करार भारतासाठी चिंतेची बाब बनला आहे. अमेरिकेच्या बांगलादेशी कापड उत्पादनांवरील शुल्क कमी केल्याने याचा भारतावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात बांगलादेश भारताचा कट्टर स्पर्धक आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन बाजाराच बांगलादेशला सवलत मिळाल्यामुळे भारताच्या कापडापेक्षा त्यांच्या उद्योगला प्राधान्य मिळेल. यामुळे अमेरिका भारताऐवजी बांगलादेशला कापड खेरदीसाठी पसंती देईल अमेरिका भारताच्या कापड निर्यातीसाठी मोठा भागीदार आहे. पण बांगालदेशला मिळालेली सवलत भारताचे अमेरिकन मार्केट कमी करु शकते. याचा भारताच्या निर्यातदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच सवलतीमुळे देखील बांगलादेशच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.
Muhammad Yunus : ‘अमेरिकेसोबत व्यापारात अपयशी…’ ; बांगलादेशचा भारताला टोला






