Emraan Hashmi Recalled When His 3 Years Old Son Diagnosed With Cancer
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या ‘ग्राऊंड झिरो’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या २५ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त रणवीर अलाहबादियाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अभिनेत्याने आपल्या लेकाच्या आजारपणाबद्दल भाष्य केलं आहे. बॉलिवूडला एकेकाळी अनेक सुपर डुपर हिट चित्रपट देणारा इमरान करियरच्या यशाच्या शिखरावर असताना त्याच्या लेकाच्या आजारपणाचं वृत्त ऐकून त्याच्या पायाखलची जमीन सरकली होती. २०१४ मध्ये त्याच्या मुलाला कॅन्सरचे निदान झाल्याबद्दल भाष्य केलं आहे.
‘आज की रात’नंतर तमन्ना भाटियाचा ‘नशा’मध्ये हॉट डान्सिंग मूव्हज, ‘रेड २’ मधील आयटम साँग रिलीज!
रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत इमरान हाश्मी म्हणाला की, “मला जेव्हा माझ्या मुलाच्या आजारपणाबद्दल कळालं, तेव्हा मी खूप चिंतेत होतो. जेव्हा माझा मुलगा २०१४ मध्ये पहिल्यांदा आजारी पडला, त्यावेळी तो माझ्या आयुष्यातील फार कठीण काळ होता. तो शब्दात मांडण्यासारखा नाही. त्या कठीण काळाचा सामना मी जवळ जवळ ५ वर्षे केला. पण त्या काळात मला खूप काही शिकायला मिळालं. माझा मुलगा जानेवारी २०१४ मध्ये आजारी पडला होत, त्याच्या आजारपणाचं वृत्त ऐकून माझ्यासह माझ्या फॅमिलीच्याही पायाखालची जमीन सरकली होती. ते वृत्त ऐकून आमच्या सर्वांचेच आयुष्य बदललं होतं.”
NCW ने दिला अपूर्व मुखिजाला पाठिंबा, आधी स्वतःच पाठवले समन्स; आता धमकी देणाऱ्यांवर करणार कारवाई!
अभिनेत्याने पुढे मुलाखतीत सांगितलं की, “मी आणि माझा मुलगा ताज हॉटेलमध्ये पिझ्झा खात होतो. त्यानंतर तो परवीनसोबत (त्याची आई) लघवीला गेला. तर त्यावेळी त्याच्या लघवीतून रक्त बाहेर पडत होतं. हे कॅन्सरचं पहिलं लक्षण होतं. आम्ही तिघंही वेळ न दवडता लगेचच डॉक्टरकडे गेलो. त्यावेळी आम्हाला डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचं सांगितलं. लगेचच डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला ऑपरेशनसाठी हॉस्पिटलला बोलवलं. त्यानंतर त्याची किमोथेरेपी करावी लागणार होती. त्या १२ तासांत माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्याची लक्षणंही आम्हाला काही दिसली नव्हती. त्याचं वय तेव्हा फक्त ३ वर्ष ११ महिने इतकं होतं. हा कॅन्सर ४ वर्षांखालील मुलांना होतो.”
Shanthi Priya चे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल, दिवंगत पतीच्या ब्लेझरमध्ये दिसला बॉसी लुक!
“जेव्हा आम्हाला त्याच्या आजारपणाबद्दल समजलं, तेव्हा आम्ही अयानसमोर रडूही शकत नव्हतो. कारण की, त्याच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं होतं. जेव्हा त्याच्या आजारपणाबद्दल आम्हाला कळलं, त्याच दिवशी आम्ही सर्व रडलो. पण, त्यानंतर सगळं काही ठीक होईल, या आशेने आम्ही सर्व जगत होतो. त्यामध्ये पहिले ६ महिने केमोथेरेपी आणि नंतर पुन्हा कॅन्सर होऊ नये म्हणून पाच वर्ष उपचार सुरू होते. प्रत्येक ३ महिन्यांनी त्याची टेस्ट करावी लागायची. मी त्यावर एक पुस्तकही लिहिलं आहे, त्याचं नाव ‘द किस ऑफ लाईफ’ असं आहे. मला आशा आहे की, एकदिवशी तो नक्की हे पुस्तक वाचेल. हे पुस्तक लिहिण्यामागील माझी प्रेरणा केवळ वैयक्तिक नव्हती, तर ती अशाच आव्हानांना तोंड देणाऱ्या इतर पालकांना पाठिंबा देणे आणि मार्गदर्शन करणे ही होती. तथापि, त्या आठवणी पुन्हा सांगणे त्याच्यासाठी खूप भावनिक आहे. मला वाटत नाही की मी ते पुन्हा वाचू शकतो किंवा त्या काळात परत जाऊ शकतो. परंतु ते एका पुस्तकाच्या माध्यमातून वाचणे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे,” असे त्याने कबूल केले.