मुंबई – अतरंगी रे चित्रपटानंतर आता अक्षय कुमार (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतचं त्यांन चित्रपटाचं नवं पोस्टर शेयर केल आहे. अतिशय हटक्या अंदाजात पोस्टर असून त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता आणखी वाढली आहे.
अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच आपल्या सोशल मिडियावर ‘बच्चन पांडे’चं नवं पोस्टर शेअर करत चित्रपट रिलीजची डेट सांगितली आहे. अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘बच्चन पांडे’ येत्या 18 मार्चला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा लूक शेयर झाल्यापासून त्याची चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती आणि आता या नवीन पोस्टरलाही चाहत्यांची पंसती मिळत आहे. या चित्रपटात कॉमेडी आणि ऍक्शन भरभरून असणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री क्रिती सेनन, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी,प्रतीक बब्बर, पंकज त्रिपाठी असे अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत. काही दिवसापूर्वी ‘बच्चन पांडे’ च्या सेटवर आग लागल्याची घटना घडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेच्या वेळी अक्षय कुमार आणि क्रिती सेनन सेटवर उपस्थित होते आणि ते चित्रपटाची तयारी करत होते. सुदैवाने, सेटवर कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अक्षय कुमार नुकताच ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान आणि साऊथ सुपरस्टार धनुषसुद्धा होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला होता. तर अक्षय कुमारने अलीकडेच त्याच्या ‘सेल्फी’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षयने नकताच चित्रपटाचा टीझर व्हिडिओ आणि फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत इमरान हाश्मीही दिसणार आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत त्याची जोडी जमली आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत त्यामुळे चाहते फारच आनंदी आहेत. चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरु होणार असल्याचं अक्षय कुमारनं सांगितलं होतं. ‘सेल्फी’ हा ड्रामा-कॉमेडी चित्रपट आहे जो मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा हिंदी रिमेक आहे.
Action ✔️
Comedy ✔️
Romance ✔️
Drama ✔️
L-O-A-D-I-N-G this Holi!#SajidNadiadwala’s #BachchanPandey in cinemas on March 18,2022@farhad_samji @kritisanon @Asli_Jacqueline @ArshadWarsi @TripathiiPankaj @prateikbabbar @saharshshukla6 #AbhimanyuSingh @NGEMovies @WardaNadiadwala pic.twitter.com/k5rw0iOLCg
— Akshay Kumar (@akshaykumar) January 18, 2022