काही दिवसापुर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमानं प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेल्या अनेक वर्षापासून सुरु या कार्यक्रमानं महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचं मनोरंजन गेलं. मात्र कार्यक्रम बंद झाल्यानं प्रेक्षकांचही मनोरंजनही बंद झालं. आता निलेश साबळे पुन्हा एकदा त्याच जोशात प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. महाराष्ट्राचा लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॅा. निलेश साबळे कलर्स मराठी वाहिनीवर नवाकोरा कार्यक्रम घेऊन येत आहे. ज्याचं नाव आहे ”हसताय ना ? हसायलाच पाहिजे!! डॉ. निलेश साबळेबरोबरच विनोदवीर भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदि कलाकार त्यांना साथ देणार आहेत.
[read_also content=”प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई, भाऊ सिद्धार्थ चोप्राचा पार पडला रोका; भावी वहिणीला अंभिनदन करत पोस्ट शेअर! https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-shared-photos-of-roka-ceremony-of-her-brother-sidhhart-chopra-with-nilam-updyay-nrps-520248.html”]
डॉ. निलेश साबळेने आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. मराठी मनोरंजन सृष्टीत त्यांचे अनेक दिवाने आहेतच पण बॅालीवूडमध्येही डॅा.निलेश साबळे यांनी सगळ्या सुपरस्टार्सना आपल्या कॅामेडीचे जबरदस्त फॅन केले. भाऊ कदम यांनीही आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात , नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेला ”हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!’ हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार – रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅामेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. त्यामुळे विनोदाचा हा पॅावरबाज डोस घेण्यासाठी सज्ज रहा.