आजकाल इस्टाग्राम सुरू केलं डझनभर सेलेब्रिटींची फोटो व्हिडिओ दिसतात. कधी कोणत्या पुरस्कार सोहळ्याचे तर कधी कुणाच्या लग्नसंमारंभातील. यावेळी सेलेब्रिटी पापाराझींना फोटोसाठी छान पोजही देताता. मात्र, त्यातही कोणत्या सेलेब्रिटीने काय परिधान केलं आणि ते कसं दिसतयं हे शूट करण्यावर पापाराझींना फोकस असतो. तर कधी कुणी फोटोसाठी नाही म्हट्ल्यावरही पापाराझी त्यांचे फोटो काढतात. यामुळे अनेकदा सेलिब्रेटी या पापाराझींवर भडकतात देखील. अनेक कलाकार हे पापाराझींविषयी राग व्यक्त करताना देखील दिसतात. नुकतचं अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत डेनरडेट गेल्यांनतर पापाराझींनी त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना फटकारले होते. आता अशीच काहीशी नाराजी नोरा फतेही (Nora Fatehi) हीने व्यक्त केली आहे.
[read_also content=”मंडप सजला, हळद लागली; वधूने हातावर मेहंदी लावली आण् 10 मिनिटांत वराचा दुर्देवी मृत्यू! https://www.navarashtra.com/india/groom-died-in-front-of-bride-at-wedding-in-kota-rajasthan-nrps-526699.html”]
आतापर्यंत अनेकदा अनेक सेलेब्रिटींनी पापारांझीविषयीचे त्यांचे अनुभव सांगतले आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे की पापाराझी त्यांच्या शरीराचे अवयव झूम करण्याचा प्रयत्न करतात. असे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकरीही त्यावर संताप व्यक्त करतात. पापराझींच असं वागणं चुकीचं असल्याचं नेटकरीही म्हणतात. नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात मृणाल ठाकूरने पापाराझींनी तिला बॅक पोझ देण्यास सांगितल्यावर तिने त्यांना नकार दिला होता. पण तरीही तिचे बॅक फोटो घेण्याचा पापाराझींनी प्रयत्न केला. यावर मृणाल ठाकूर नाराजी व्यक्त केली होती. आता अभिनेत्री नोरा फतेही ही देखील पापाराझींवर नाराजी देखील व्यक्त केली आहे.
एका मुलाखीतमध्ये बोलताना नोरा म्हणाली की, मला वाटते की त्यांनी (पापाराझी) याआधी कधीही कोणाचीही पाठ पाहिली नाही आणि जे आहे ते आहे. हे माझ्यासोबतच नाही तर इतर महिला कलाकारांसोबतही होतं. पण कदाचित त्यांच्या पाठिवर झूम केलं जात नाही, कारण ते तितकं खास वाटत नसेल. परंतु ते अनावश्यकपणे शरीराच्या इतर भागांवर झूम करतात. कधीकधी मला वाटते की झूम इन करण्यासारखे काहीही नाही मग ते कशावर लक्ष केंद्रित करत असतात? असा सवाल देखील नोराने विचारला आहे.
नोरा नुकतंच मडगाव एक्सप्रेस या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटाने बॅाक्सऑफिसवर फार कमाल केली नसली तरीह चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला आहे. आता नोरा फतेही ही साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल 5’ आणि ‘100 पर्सेंट’ या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.






