ओटीटी प्लॅटफार्म अॅमेझान प्राईमवरील लोकप्रिय वेबसिरिज पंचायत (Panchayat) आता नव्या सिझनसह प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहे. काही दिवसापुर्वी अॅमेझान प्राईमनं एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. तेव्हापासून ‘पंचायत’च्या तिसरा सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. मात्र, आता प्रेक्षकांना नव्या सिझनसोबत नवा ट्विस्टही बघायला मिळणार आहे. असं काय विशेष होणार आहे या सिझनमध्ये जाणून घेऊया.
[read_also content=”आधी BMW मध्ये प्रवास करणं आणि नंतर BMW खरेदी करणं म्हणजे स्ट्रगल नव्हे, शाहिद कपूरनं नेपो किड्सचा घेतला समाचार! https://www.navarashtra.com/movies/shahid-kapoor-on-nepotism-travelling-in-bmw-then-buying-bmw-is-not-stuggle-nrps-518215.html”]
गेल्या अनेक दिवसापासून वेबसिरिज पंचायच्या तिसऱ्या सिझन बद्दल चर्चा सुरू आहे. आता येत्या काही दिवसात प्रेक्षकांना त्यांची आवडती वेबसिरिज पाहायला मिळणार आहे.नुकतचं पंचायत 3’ ची (Panchayat Season 3) झलक दाखवण्यात आली. या दरम्यान ‘पंचायत 3′ मधील एक ट्विस्ट समोर आला आहे. यापुर्वीच्या दोन सिझनमध्ये सचिवची भूमिका अभिनेता जितेंद्र कुमारने केली होती. आता नव्या सिझनमध्ये सचिवची भूमिका करणारा हा चेहरा बदलणार आहे.
रिपोर्टनुसार,’पंचायत 2’ वेब सीरिजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आमदार गावात झालेल्या अपमानानंतर सचिवाची बदली करण्याचा विचार करत असल्याचे दाखवले. आता, तिथूनच कथानक पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. गावात आता गणेश ही व्यक्ती आता नवीन सचिव असणार आहे. ‘पंचायत’च्या पहिल्या सीझनमध्ये “गजब बेइज्जती है” हा संवाद प्रसिद्ध झाला होता. यावर मीम्सचा पाऊस पडला होता. आसिफ खानने गणेश ही व्यक्तीरेखा साकारली होती. “गजब बेइज्जती है” हा संवाद आसिफच्या तोंडी नव्हता. तरीही तो प्रसिद्ध झाला. गणेश हा फुलेरा गावाचा जावई असतो. लग्नाच्यावेळी झालेला कथित अपमान, मुलीकडील लोकांनी गैरसोय करणे अशा वेगवेगळ्या कारणांनी वऱ्हाड नाराज असते. आता, हाच जावई फुलेरा गावचा ‘सचिवजी’असणार आहे.