प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) मराठी इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक…पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेल्या प्रार्थनाने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका साकारल्या. झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील नेहा सर्वांनाच आपलीशी वाटली. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सोबत तिचं असलेलं ऑनस्क्रीन बॉन्डींग प्रेक्षकांना खूप आवडलं. जय महाराष्ट्र, ढाबा भटींडा,कॉफी आणि बरंच काही, मितवा हे प्रार्थनाचे गाजलेले चित्रपट….अभिनय क्षेत्रात तिने आपला ठसा उमटवल्यानंतर, मॉडेलिंग क्षेत्रातही ती आपलं नशीब आजमावत आहे.
प्रार्थनाचे अनेक बोल्ड फोटोशूट प्रचंड व्हायरल होत आहेत…त्यामुळे, तिच्या फॉलोअर्सची संख्याही वाढत चालली आहे. नुकतचं तिने एका मराठमोळ्या नऊवारी साडीत फोटोशूट केलं. त्याची जोरदार चर्चा होत आहे. तिच्या चाहत्यांनी प्रार्थनावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रार्थनाच्या मराठमोळ्या फोटोशूटमध्येही तिने इन्स्टाग्रामवर नुसती आग लावली आहे. सिल्वर ज्वेलरीसह, खणाचे ब्लाऊज,कॉटन साडी, ओपन हेअरमध्ये माळलेला गजरा आणि कमरेला असलेला सिल्वर पट्टा यामुळे तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडली आहे.
अतिशय सिंपल लूकमध्येही प्रार्थनाने सर्वांची मनं जिंकली आहेत….
प्रार्थना कोणत्याही आऊटफीटमध्ये फीट होते…ती छान कॅरीही करते. तसंच, तिचे डोळे खूप बोलके आणि तिच्या चेह-यावरचं स्मितहास्य सर्वांनाच भुरळ घालतं. ती कोणतही काम करताना त्यात रमते आणि म्हणूनच ती सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते.