(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
रोहन परशुराम कानवडे यांच्या ‘सबर बोंडा’ या पहिल्या मराठी चित्रपटाला प्रतिष्ठित सनडान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी पारितोषिक मिळाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर याची घोषणा करण्यात आली आहे. या बातमीने चित्रपटांच्या निर्मात्यांसह चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. ‘सबर बोंडा’ या चित्रपटाची कथा खूप प्रेक्षकांना भावणारी आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
‘साबर बोंडा’ ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील एका गावात घडणारी एक समलैंगिक प्रेमकथा आहे, ज्यामध्ये भूषण मनोज, सूरज सुमन आणि जयश्री जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे इंग्रजी नाव ‘कॅक्टस पिअर्स’ आहे. ही कथा आनंद या ३० वर्षीय शहरात राहणाऱ्या तरुणाची आहे, ज्याला त्याच्या वडिलांच्या निधनानंतर १० दिवसांचा शोक साजरा करण्यासाठी पश्चिम भारतातील एका ग्रामीण भागात पाठवले जाते. इथे तो लग्न टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्थानिक शेतकऱ्याशी भावनिकरित्या जोडला जातो. या चित्रपटांची कथा प्रेक्षकांना खूप वेगळा अनुभव देणारी आहे.
चित्रपटाचे केले ज्युरीने कौतुक
महोत्सवातील या श्रेणीतील सिनेमासाठी ज्युरीमध्ये चित्रपट समीक्षक अवा कहाणे, केनियाचे चित्रपट निर्माते वानुरी कहियू आणि ऑस्कर विजेते ब्रिटिश अभिनेता डॅनियल कालुया यांचा समावेश होता. ज्युरींनी ‘सबर बोंडा’ हे एक उत्तम आधुनिक प्रेमकथा म्हणून वर्णन केले. ते म्हणाले, “या संवेदनशील चित्रपटाला पुरस्कार मिळणे हा एक सन्मान आहे. आम्ही रडलो, हसलो आणि आम्हालाही तेच मिळावे अशी आमची इच्छा होती. आज जगाला अशाच प्रकारच्या प्रेमाची गरज आहे. हा खरा दृष्टिकोन आपल्याला एका जिव्हाळ्याच्या भाषेत प्रवेश करण्यास अनुमती देतो. हे आपल्याला असे काहीतरी करण्याची संधी देते जे आपण सर्वांना समजते.” असे म्हणून त्यांनी आपले मत मांडले आहे.
डबल नव्हे ट्रिपल धमाका, अंकुश चौधरीने केली लोकप्रिय मराठी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा
हे आहेत चित्रपटाचे निर्माते
ज्युरी पुढे म्हणाले, “आम्हाला मुख्य पात्राच्या आतील जीवनाची भावना जाणवते आणि जेव्हा ती स्फोट होते तेव्हा ती आपल्याला त्याच्या गोडव्याने व्यापून टाकते.” हा चित्रपट भारत, ब्रिटन आणि कॅनडाची संयुक्त निर्मिती आहे. याची निर्मिती नीरज चुरी, मोहम्मद खाकी, कौशिक रे, हरीश रेड्डीपल्ली, नरेन चंदावरकर आणि सिद्धार्थ मीर यांनी केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी नक्कीच पाहायला हवा असे त्यांचे म्हणणे आहे.