Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ओ बावरी’ लव्हसाँगने यंदाचा व्हॅलेंटाईन डे होणार अधिकच स्पेशल…

संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा…’चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रचंड वाढवली असतानाच आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त चित्रपटातील 'ओ बावरी' हे रोमँटिक गाणे रिलीज झालेय.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 14, 2025 | 05:11 PM
‘ओ बावरी’ लव्हसाँगने यंदाचा व्हॅलेंटाईन डे होणार अधिकच स्पेशल…

‘ओ बावरी’ लव्हसाँगने यंदाचा व्हॅलेंटाईन डे होणार अधिकच स्पेशल…

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता पुष्कर जोग नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट घेऊन येत असतो. अशाच एका संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. पोस्टरने चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रचंड वाढवली असतानाच आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने चित्रपटातील ‘ओ बावरी’ हे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या प्रेमगीताला सोनू निगम यांचा सुमधुर आवाज लाभला आहे. तर रोहन- रोहन यांनी जबरदस्त संगीत दिले आहे.

‘मनमोही’ गाण्यात सावनी रवींद्रच्या अभिनयाची जादू, अभिजित खांडकेकरसोबत जुळणार लव्हकेमिस्ट्री!

गाण्यातून मनातील भावना व्यक्त होत असतानाच या गाण्यातील प्रत्येक दृश्य प्रेक्षकांच्या डोळ्यांना सुखावणारे आहे. दुबईमधील प्रसिद्ध आणि नयनरम्य ठिकाणी या गाण्याचे चित्रीकरण झाले असून फुलांनी सजलेले मिरॅकल गार्डन असो किंवा दुबईचे प्रसिद्ध डेझर्ट असो. दुबईच्या भव्य आणि रमणीय ठिकाणी पार पडलेल्या चित्रीकरणामुळे या गाण्याला एक वेगळीच भव्यता प्राप्त झाली आहे. पुष्कर जोग आणि हेमल इंगळे यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना यात पाहायला मिळतेय. “हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?” या चित्रपटात वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे. हा चित्रपट २१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ” ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा चित्रपट वैवाहिक नातेसंबंधांवर आधारित आहे. जिथे तुम्हाला प्रेम, विश्वास, संवाद आणि मानवी भावना यांचा हृदयस्पर्शी प्रवास पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाला एक विशेष स्थान आहे आणि ‘ओ बावरी’ हे गाणं त्या अनोख्या भावनेचे दर्शन घडवते. गाण्याचे चित्रीकरण दुबईमध्ये झाले असून हा खूप वेगळा अनुभव होता. मला विश्वास आहे की, हे गाणे प्रेक्षकांच्या मनाचा नक्कीच ठाव घेईल.व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आम्ही हे गाणे प्रेमीयुगुलांच्या भेटीला आणले आहे. प्रत्येक कपलला हे गाणं नॅास्टेल्जिक बनवेल. जुन्या दिवसांची आठवण करून देईल किंवा ज्यांना आपल्या मनातील प्रेमभावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांना हे गाणं नक्कीच मदत करू शकेल.”

काय सांगता? व्हॅलेंटाइनच्या मुहूर्तावर उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हायरल फोटोंमुळे चर्चेला उधाण, जाणून घ्या सत्य

आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंटल यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे

Web Title: Pushkar jog and hemal ingle starrer hardik shubhechcha pan taycha kay marathi movie o bawari song released on social media this song shoot on dubai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • Entertainment News
  • News Song
  • pushkar jog

संबंधित बातम्या

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
1

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

“बाबांशिवाय इतकं सगळं माझ्यासाठी अजून कुणी केलं असतं” ; वडिलांच्या वाढदिवशी मुग्धा वैशंपायनची खास पोस्ट
2

“बाबांशिवाय इतकं सगळं माझ्यासाठी अजून कुणी केलं असतं” ; वडिलांच्या वाढदिवशी मुग्धा वैशंपायनची खास पोस्ट

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
3

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…’, विजय देवरकोंडाने सर्वांसमक्ष रश्मिकाला ओढले जवळ आणि…Video Viral
4

‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…’, विजय देवरकोंडाने सर्वांसमक्ष रश्मिकाला ओढले जवळ आणि…Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.