राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणांनी सतत चर्चेत असते. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी आपल्या लग्नाबद्दल खुलासा करणाऱ्या ड्रामा क्वीन राखी सावंत घटस्फोट घेणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अखेर, ही डायव्होर्सची प्रक्रिया सुरू झाल्याचं खुद्द राखीनेच जगजाहीर केलं आहे. हे सांगताही ही ड्रामा क्विन राखीचा ड्रामा पहायला मिळाला. राखीने वर्षभरापूर्वी आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं होतं. पण तिच्या आईच्या निधनानंतर तिचं पतीशी पटत नसल्याचं ती अगदी खुल्लम खुल्ला सांगायची. अगदी त्याने मारहाण केली, फसवणूक केली असे आरोपही तिने करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आदिल खान दुर्रानीची तुरुंगात रवानगी केली होती. (rakhi sawant) (aadil khan) (rakhi-aadil divorced)
आदिल तुरुंगात असतानाच राखीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता त्या दोघांचाही घटस्फोट होणार आहे, याबाबत राखीने वाजत गाजत ही घोषणा केली. सोमवारी राखी लाल रंगाच्या लेहेंग्यात नाचताना दिसली आणि तिने आदिल खानशी घटस्फोट होत असल्याचं सांगितलं. घटस्फोटानंतर लोक दुःखी होतात पण आपल्याला घटस्फोटाचा आनंद झाल्याचं राखी म्हणाली.
[read_also content=”निगेटीव्ह पब्लिसिटी, अॅडव्हान्स बुकींगमुळे पहिल्या विकेंडला ‘आदिपुरूष’ची 340 कोटींची जबरदस्त कमाई….’पठाण’चा मात्र रेकॉर्ड मोडण्यात फेल https://www.navarashtra.com/entertainment/adipurush-collection-over-three-hundred-corer-419545/”]
“होय, मी माझा घटस्फोट होत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी असतात, पण मी आनंदी आहे,” असं राखी सावंत म्हणाली. या व्हिडीओमध्ये राखी डोक्यावर ओढणी घेऊन नाचताना ती दिसत आहे. आदिल खानपासून घटस्फोट घेणार असल्याने खूप खूश असल्याचं राखीने सांगितलं.
राखी सावंतने वर्षभरापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारून आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं होतं. तिने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं होतं. राखी सावंतने लग्नाची बातमी सहा महिने लपवून ठेवली होती. पण आदिलचं एक्स्ट्रा मॅरेटीअल अफेअर असल्याचं तिला समजलं. त्यानंतर, तिने आपल्या लग्नाचा खुलासा केला. अवघ्या महिनाभरातच तिने आदिलविरोधात तक्रार केली होती. राखीच्या तक्रारीव्यतिरिक्त म्हैसूरमधील एका इराणी तरुणीनेही आदिलवर बलात्काराचा आरोप केला होता.