रणबीर कपूरच्या आगामी ‘शमशेरा’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकचं अनावरण करण्यात आलं आहे. अॅक्शन एंटरटेनरने भरपूर असलेल्या या चित्रपटातील रणबीरचा लूक चाहत्यांना पंसतीस उतरलाय. हा चित्रपट 22 जुलै प्रदर्शित होणार आहे.
आता आलिया भट्टने तिच्या सोशल मीडियावर शमशेरामधील रणबीरच्या फर्स्ट लूकवर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या पतीचे पोस्टर शेअर करत तिने कॅप्शन दिले: “आता ही हॅाट मॅार्निग आहे.. म्हणजे.. शुभ सकाळ”. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रणवीरला लांब केस आणि दाढी असलेला लूक केला आहे. त्याच्या हातात कुऱ्हाडीसारखे हत्यारही दिसत आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त आणि वाणी कपूर देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 22 जुलैला हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे.
[read_also content=”देसी गर्ल प्रियंकाचं देसी प्रेम, लेकीसाठी केली ‘ही’ खास गोष्ट! https://www.navarashtra.com/entertainment/desi-girl-priyankas-desi-love-she-have-done-made-somthing-special-thing-for-her-doughter-nrps-294759/”]