ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने (Amazon Prime Video) आज फोर मोर शॉट्स प्लीज! (Four More Shots Please !) या एमी पुरस्कारांसाठी नामांकन पटकावणाऱ्या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली. या सीरिजचा तिसरा सीझन २१ ऑक्टोबरला भारत आणि इतर २४० देश-प्रदेशांत रिलीज होणार आहे.
प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्सची निर्मिती, जोयीता पटपटिया यांचे दिग्दर्शन, देविका भगत यांचे लेखन व इशिता मोईत्रा यांचे संवाद असलेली ही बहुप्रतिक्षित ॲमेझॉन ओरिजिनल सीरिज दुसऱ्या सीझनमध्ये ज्या नाट्यमय वळणावर थांबली होती तिथूनच पुढे तिसरा सीझन सुरू होणार आहे. उगाच कशाचाही पश्चात्ताप न करत बसणाऱ्या, लोक काय म्हणतील याची तमा न बाळगणाऱ्या चार मुक्त स्त्रियांची आयुष्ये ही सीरिज पुन्हा एकदा पडद्यावर जिवंत करणार आहे. मुंबईत राहणाऱ्या या चौघी आयुष्य जगतात, प्रेम करतात, चुका करतात आणि नवीन काही शोधतात. या सगळ्यातून जाताना त्यांच्यातील मैत्रीचे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते.
सीझन थ्रीमध्ये कीर्ती कुल्हारी, सयानी गुप्ता, मानवी गगरू आणि बानी, प्रतीक बब्बर, लिसा रे, नील भूपालन, राजीव सिद्धार्थ, अम्रिता पुरी, सिमोन सिंग व समीर कोचर त्यांच्या पूर्वीच्या भूमिकांमध्ये कायम आहेत. नवीन सीझनमध्ये जिम सर्भ, रोहन मेहरा, शिल्पा शुक्ला व सुशांत सिंग नव्याने दिसणार आहेत.
triple the fun, drama, and sass!#FourMoreShotsPlease S3, new season on Oct 21!@PritishNandy @RangitaNandy #IshitaPritishNandy @joyeetacruises #DevikaBhagat @ishita_moitra @IamKirtiKulhari @sayanigupta @bani_j @maanvigagroo @prateikbabbar @neilbhoopalam @jimSarbh pic.twitter.com/2vTWvQPKtg
— prime video IN (@PrimeVideoIN) October 7, 2022
“आमच्या पहिल्या दोन सीझन्सना मिळालेल्या यशामुळे आम्हाला तिसरा सीझन आणण्यासाठी चालना मिळाली आहे. फोर मोर शॉट्स प्लीज! च्या तिसऱ्या सीझनमध्ये इटली व पंजाबचा प्रवास आहे; यातील नाट्य अधिक मोठे आहे, प्रमाण अधिक भव्य आहे आणि व्यक्तिरेखांमधील मैत्री अधिक घट्ट आहे. या शोला २०२१ आंतरराष्ट्रीय एमीजमध्ये नामांकन मिळाले. यातून फोर मोर शॉट्स प्लीज!ने भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे हे तथ्य दिसून येते. फोर मोर शॉट्स प्लीज!मध्ये स्त्रियांमधील मैत्री जशी साजरी केली गेली आहे, तशी कोणत्याच शोमध्ये केली गेलेली नाही आणि या नवीन सीझनच्या माध्यमातून आमचा चाहतावर्ग आणखी वाढेल अशी आशा मला वाटत आहे,” असे निर्माते प्रीतिश नंदी म्हणाले.
“पहिल्या सीझनमध्ये तुम्ही अंजना, दामिनी, उमंग व सिद्धीला भेटलात. दुसऱ्या सीझनमध्ये तुम्ही त्यांना आयुष्यातील धडे व चुकांमुळे अडखळताना बघितले. आता सीझन ३ मध्ये आपला सूर गवसलेल्या या मुलींना बघा. तसे बघायला गेले तर सीझन ३ हा आमचा सर्वांत व्यक्तिगत सीझन आहे. या मैत्रीचा भाग व्हावे असे तुम्हाला वाटणार नाही हे शक्यच नाही,” असे क्रिएटर रंगिता प्रीतिश नंदी म्हणाल्या.
[read_also content=”उफ तेरी अदा! रश्मी देसाईला पाहून चाहते घायाळ https://www.navarashtra.com/gallery/uff-teri-ada-fans-are-shocked-to-see-rashmi-desai-333416/”]
फोर मोर शॉट्स प्लीज!चा सीझन ३ हा प्राइम व्हिडिओच्या सणासुदीनिमित्त आणलेल्या लाइन-अपचा एक भाग आहे. २३ सप्टेंबरपासून भारतीय सणांची धामधूम सुरू झाली आहे. या लाइन-अपमध्ये विविध भाषांतील अन्य अनेक ओरिजिनल सीरिज व ब्लॉकबस्टर मुव्हींचा समावेश आहे. याशिवाय प्राइम व्हिडिओ चॅनल्सच्या माध्यमातून पार्टनर्स अनेक आकर्षक ‘दिवाळी स्पेशल डिसकाउंट्सही’ देत आहेत.