‘मिस इंडिया’ आणि ‘मिस युनिव्हर्स’ होण्याचा मान पटकावणाऱ्या सुश्मिता सेनचा (SushmitaSen) आज ४७ वा वाढदिवस आहे. सुष्मिता सेनने १९९६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. खूप कमी वयात तिने रेने आणि अलिसा या दोन मुलींना दत्तक घेतले होते. सुष्मिताच्या वाढदिवसाचे (Sushmita Sen Birthday) निमित्त साधत तिची मुलगी रेने सेनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
रेनेनी लिहीलं आहे की,“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लाईफलाईन.. आता तू तुझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी टप्प्यामध्ये प्रवेश करत असताना मला फक्त तुला धन्यवाद म्हणायचे आहे. तुझं मन खूप मोठं आहे. यामुळेच तू लोकांना माफ करु शकतेस. तुझी मुलगी होणं हा मला देवाने दिलेला आशिर्वाद आहे. तुझ्या कामाला तोड नाही. मी याची साक्षीदार आहे, याचा मला .”
[read_also content=”महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद उच्चस्तरीय समिती गठीत; येत्या सोमवारी बैठक https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-karnataka-border-dispute-high-level-committee-formed-so-meeting-next-monday-nrgm-346309/”]
“तुझ्या कामामध्ये प्रेम, समर्पण आणि मेहनत आहे. परिसस्पर्शाने तू ज्याला हात लावेतस, ती गोष्ट सोनं बनते. तू अभिनयाची संस्था आहेस. तू इतकं प्रामाणिकपणे काम करतेस की ते पाहून मी तुझ्या अभिनयामध्ये तुझ्या अस्तित्वाचं प्रतिबिंब असल्याचा आभास होतो. माझा सांभाळ करताना मला तुझ्यामधील कृतज्ञता, धैर्य आणि दयाळूपणाचा अनुभव मला आला. या भावनेने तू मला वाढवलंस. मला स्वत:ची ओळख मिळवून देण्यासाठी मदत केलीस. तू सोडून मला दुसऱ्या कोणाबरोबरही राहायचं नाहीये. तूच माझ्यासाठी घर असं आहे. तू जिकडे आहेस, तिकडे घर आहे”, असे तिने म्हटले.
त्यापुढे ती म्हणाली, “शिखरावर असतानाही पाय जमिनीवर कसे ठेवावेत हे शिकवल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या आयुष्यामध्ये तू घेतलेल्या निर्णयांची योग्यता मी जसजशी मोठी होतेय तसतशी कळत आहे. शिस्त आणि सातत्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक-एक पाऊल टाकणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवून देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला आणि अलिसाला स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणं शिकवण्यासाठी मी तुझे आभार मानते. शिखरावर असतानाही पाय जमिनीवर कसे ठेवावेत हे शिकवल्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई” असेही रेने सेनने या पोस्टमध्ये म्हटले आहे.






