भारताचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ 5Th 20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामान्यापूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने ३-१ अशी आघाडी घेतली आहे. भरतीय संघ विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी२० सामन्यात पराभूत झाला होता. हा पराभव विसरून संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरण्यास उत्सुक असेल. तर मालिका गमावणाऱ्या न्यूझीलंड संघ हा सामाना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्ही काल रात्री येथे होतो, खूप दव होते आणि आम्हाला स्वतःची कसोटी घ्यायची आहे. मैदानाचे रक्षक म्हणतात की खेळपट्टी ४० षटके सारखीच राहील. अक्षर परत आला आहे, ईशान परत आला आहे आणि आणखी एक खेळाडू आहे. काळजी करू नका तिरुवनंतपुरम, संजू सॅमसन आज रात्री खेळत आहे. आम्ही त्याची (तिलकची) वाट पाहत आहोत. आम्ही जवळपास सर्व विभागांमध्ये तयारी केली आहे, प्रत्येक सामन्यातून आम्ही काहीतरी शिकतो आणि ते पुढे घेऊन जातो.”
🚨 Toss Update 🚨#TeamIndia elect to bat in the Final #INDvNZ T20I Updates ▶️ https://t.co/Thau28CPuZ@IDFCFIRSTBank pic.twitter.com/9Wo6lLsnUs — BCCI (@BCCI) January 31, 2026
टॉस गमावणारा न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, “आज रात्री दव जास्त पडणार नाही. आम्ही संघात चार बदल केले आहेत – कॉनवेच्या जागी ॲलन, चॅपमनच्या जागी नीशम, केजे आणि लॉकी संघात आले आहेत. त्यांना संघात परत पाहून नेहमीच आनंद होतो. आणि त्यांच्यात काय क्षमता आहे हे पाहण्याची ही एक संधी आहे.”
भारत प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेवन जेकब्स, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी






