होंबाळे फिल्म्सच्या (Hombale Films) ‘कांतारा’ने आपल्या उत्कृष्ट कथानक आणि सीन्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 450 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर कमाईचा एक नवा रेकॉर्ड ‘कांतारा’ने (Kantara) प्रस्थापित केला. तसेच, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या चित्रपटाचे कौतुकही केले. इतकेच नाही तर ‘कांतारा’ हा 2022 चा ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून उदयास येऊन वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला.(Kantara Prequel)
प्रेक्षक अजूनही ‘कांतारा’च्या प्रेमात असताना, या चित्रपटाच्या सिक्वेलच्या अफवांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली होती. सिनेमाला मिळालेल्या उदंड यशानंतर, प्रेक्षक याच्या सिक्वेलच्या घोषणेची वाट पाहत होते. निर्मात्यांनी आता अखेर चित्रपटाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.
‘कांतारा’ने नुकतेच 100 दिवस पूर्ण केले असून, या क्षणाचा आनंद घेत चित्रपटाच्या टीमने सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनच्या खास प्रसंगी चित्रपटाचे लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी ‘कांतारा’च्या सिक्वेलबद्दल खुलासा केला आणि म्हणाले, “आम्ही प्रेक्षकांचे खूप आभारी आहोत. त्यांनी ‘कांतारा’ला अपार प्रेम आणि पाठिंबा देऊन हा प्रवास पुढे नेला, सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने या चित्रपटाने यशस्वीरित्या 100 दिवस पूर्ण केले आहेत. अशातच, या विशेष प्रसंगी मी ‘कांतारा’च्या प्रीक्वेलची घोषणा करत आहे. तुम्ही पाहिलेला पार्ट 2 आहे, पार्ट 1 पुढील वर्षी येईल. ‘कांतारा’ चित्रपटाचे शूटिंग करत असताना ही कल्पना माझ्या मनात आली कारण कांताराचा इतिहास अधिक खोल आहे. तसेच, या सिनेमाच्या लिखाणावरही आम्ही काम करत आहोत. संशोधन अद्याप सुरू असल्याने चित्रपटाबद्दल तपशील उघड करणे फार लवकर होईल.”
[read_also content=”पाकिस्तानने पुन्हा एकदा मध्ये नाक खुपसलं, तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना पडला वळसा, नक्की झालं तरी काय ? https://www.navarashtra.com/world/pakistan-denied-airspace-for-indian-aircraft-going-to-turkey-to-help-earthquake-affected-persons-nrsr-368034/”]
‘कांतारा’च्या प्रीक्वेलची निर्मिती होंबाळे फिल्म्स अंतर्गत विजय किरागंदुर आणि चालुवे गौडाद्वारा होणार असून, या चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या घोषणेमुळे आता चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जसा प्रतिसाद कांताराला मिळाला तसाच तो त्याच्या प्रीक्वेललाही मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढच्या वर्षी ‘कांतारा’चा प्रीक्वेल येणार आहे.