गणेश आचार्यचा (Ganesh Acharya) ‘देहाती डिस्को’ (Dehati Disco) हा चित्रपट २७ मे रोजी रिलीज होत आहे. यातील गाण्यांनी प्रेक्षकांची मने आधीच जिंकली आहेत. साहिल खानची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. अनेक वर्ष असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केल्यानंतर ‘देहाती डिस्को’ सिनेमाद्वारे साहिल खान (Sahil Khan) अभिनयाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे. त्याचा हा प्रवास खूपच प्रेरणा देणारा आहे.
[read_also content=”‘बॉबी देओल एक उत्तम सहकलाकार’, आदिती पोहणकरने शेअर केला ‘आश्रम’चं शूटींग करताना आलेला अनुभव https://www.navarashtra.com/movies/aditi-pohankar-shares-her-experience-with-bobby-deol-while-shooting-for-aashram-web-series-nrsr-284828.html”]
आपल्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबाबत साहिल खान म्हणाला की,“ मी बॉलिवूडमध्ये असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ‘वॉर’मधील घुंगरू गाण्यापासून ‘भूलभूलैय्या २’ च्या गाण्यांपर्यंत अनेक गाण्यांसाठी मी कोरिओग्राफी केली आहे. अचानक एके दिवशी लॉकडाऊनमध्ये माझ्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला. मला ‘देहाती डिस्को’च्या कास्टींग टीमकडून फोन आला आणि मी मास्टर जी आणि दिग्दर्शक मनोज शर्मांना भेटलो.
तो पुढे म्हणाला की, मला वाटलं ‘उपरवाले’ गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी बोलावलं असेल.पण नंतर कळलं की मी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेसाठी काम करणार आहे. मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. क्षणभर काहीच सुचेना. गणेश आचार्य आणि दिग्दर्शक मनोज शर्मा अशा दिग्गजांमुळं मी आता चित्रपटामध्ये झळकणार आहे.”
‘देहाती डिस्को’ मध्ये साहिल खानच्या अभिनयाची झलक पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. नृत्यावर आधारित हा एक वेगळा चित्रपट असल्याने प्रेक्षकांसाठी तो पर्वणीच ठरेल, यात शंका नाही.