फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी मध्यरात्री मुंबईतील वांद्रे येथील राहत्या प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. पण, आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. हल्ल्यानंतर अभिनेत्याला त्याचा मुलगा तैमुर आणि एक कर्मचारीने त्याला रुग्णालयात नेले. अभिनेत्याला त्याच्या घराजवळ काही अंतरावर असलेल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेता रुग्णालयामध्ये रिक्षाने गेला होता. नुकतंच अभिनेत्याने बॉम्बे टाईम्सला मुलाखत दिली, या मुलाखतीत अभिनेत्याने तो हल्ल्यानंतर रिक्षाने हॉस्पिटलमध्ये का गेला होता, याचं उत्तर दिलं.
मिलिंद गुणाजीची माथेरान सफर, लुटला निसर्गाचा मनमुराद आनंद…
कोट्यवधींचा मालक असलेल्या सैफकडे आणि करीनाकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. पण हल्ल्याच्यादिवशी अभिनेता हॉस्पिटलमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत रिक्षाने गेला होता. त्याच्यासोबत ८ वर्षांचा तैमूर आणि एक कर्मचारी होता. घरी गाड्या, ड्रायव्हर असूनही सैफ रिक्षाने रुग्णालयात का गेला, याचं अखेर सैफनेच उत्तर दिलंय.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सैफने सांगितलं की, “आमच्या घरी रात्रभर कोणताही ड्रायव्हर थांबत नाही. पण, घरी थांबणारे काही जणं ते ड्रायव्हर नसतात. जर आम्हाला घरातल्यांना रात्री बाहेर जायचं असेल किंवा काही महत्त्वाचे काम असेल तरच त्यांना थांबायला सांगतो. हल्ला झाल्यानंतर मला आमच्या कारच्या चाव्याही सापडत नव्हत्या, जर का त्या मला सापडल्या असत्या तर मीच गाडी चालवून रुग्णालयात गेलो असतो. माझ्या पाठीला त्रास होत होता, पण मी पूर्ण शुद्धीत होतो. आमच्या घरी पोहोचायला ड्रायव्हरला वेळ लागला असता, म्हणून मी रिक्षाने रुग्णालयात गेलो.”
ममता कुलकर्णीने दिला ‘महामंडलेश्वर’ पदाचा राजीनामा; म्हणाली, “साध्वी होती, साध्वीच राहिन…”
हल्ल्यानंतर सैफ ५ दिवसातच रुग्णालयातून घरी परतला. त्याच्या पाठीवर इतकी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तरीही तो इतक्या लवकर बरा कसा काय झाला ? या मुद्द्यावरुन अनेकांनी त्याला ट्रोल केलं होतं. त्या विषयावर सैफने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “माझ्या अंदाजे लोकं कोणताही प्रसंगं असो, काहीतरी प्रतिक्रिया देणारच. काही लोकं खिल्ली उडवतील. अनेकांचा तर माझ्यावर विश्वासचं बसणार नाही, त्यामुळे ते माझी खिल्ली उडवणारच. मला वाटते की हे ठीक आहे. असं काही घडल्यावर लोकांची सहानुभूती मिळाली असती, तर ते सगळं निरस वाटलं असतं. मला हेच अपेक्षित असल्याने त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही,” असं सैफ म्हणाला.