फोटो सौजन्य: सोशल मीडिया
माथेरान- संतोष पेरणे
आपल्या उमेदीच्या काळात माथेरान मध्ये येवून अनेक दिवस भटकंती करणारे अभिनेते मिलिंद गुणाजी यांचे माथेरान वरील प्रेम आणि भटकंती आजही कमी झालेली नाही.माथेरान भेटीवर आलेले मिलिंद गुणाजी यांनी प्रेक्षणीय पॉइंटला भेटी दिल्या आणि पिसरनाथ महाराजांचे दर्शन घेतले. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी मधील अनेक आघाडीचे कलावंत यांचे माथेरान प्रेम सर्वांना माहिती आहे. जॅकी श्रॉफ आणि मिलिंद गुणाजी हे आपल्या कितीही व्यस्त असलेल्या शेड्युल मधून वेळ काढून वर्षातून दोनदा तरी माथेरान मध्ये येत असतात.
ममता कुलकर्णीने दिला ‘महामंडलेश्वर’ पदाचा राजीनामा; म्हणाली, “साध्वी होती, साध्वीच राहिन…”
श्रावण महिन्यात येवून श्री पिसर नाथाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून भेट देणारे जॅकी श्रॉफ हे त्यापैकी एक उदाहरण आहे. तर उन्हाळयात येवून माथेरानच्या रानवाटा पालथ्या घालणारे अभिनेते आणि भटकंती चे निर्माते मिलिंद गुणाजी हे माथेरान भेटीवर आहेत.त्यांचा नेहमी प्रमाणे मुक्काम हा रेल्वे स्टेशन समोरील दिवाडकर हॉटेल मध्ये आहे.तर दिवाडकर हॉटेलचे मालक संदीप दिवाडकर यांच्या सोबत गप्पांची मैफल आणि माथेरानची भटकंती करायची असेल तर सोबत असतो निमेश मेहता हा मित्र.
भर कॉन्सर्टमध्येच सोनू निगम चाहत्यांवर भडकला; म्हणाला, ‘उभंच राहायचं असेल तर निवडणुकीत…’ Video Viral
मिलिंद गुणाजी यांनी आपल्या या भेटीत माथेरान कालचा अख्खा दिवसभर भटकंती केली.खंडाळा पॉइंट येथून गार्बेट परिसर आणि आदिवासी वाड्या न्याहाळताना मिलिंद गुणाजी या भागातील बदलाबद्दल काहीसे भावूक झालेले दिसले.एसटी गाडी खंडाळा पॉइंटचे खाली असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये आलेली पाहून आनंद झाल्याचे देखील नीमेश मेहता यांना सांगितले.त्यांनतर तेथून अलेक्झांडर पॉइंट या मिलिंद गुणाजी आपल्या सर्वात आवडत्या पॉइंट वर पोहचले. तेथून कर्जत लोणावळाचा परिसर न्याहाळत तब्बल दीड दोन तास निसर्गाचा आस्वाद घेतला.त्यावेळी तेथे आलेले घोडेवाले आणि पर्यटक हे मिलिंद गुणाजी यांना पाहून आनंदी झाल्याचे दिसून आले.
सोनू सूद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाला न्यायालयात हजर, फसवणूक प्रकरणात अभिनेत्याने दिली साक्ष!
अनेकांनी मिलिंद गुणाजी सोबत फोटो काढले सेल्फी काढले.आपले माथेरान मधील मित्र निमेष मेहता यांच्या हॉटेल वर बसून सायंकाळचे वातावरण पाहून आज सकाळी माथेरानचे ग्रामदैवत असलेल्या पिसारनाथ महाराज यांच्या शारलोट लेक भागातील मंदिरात दर्शन घेण्यासाठी पायी पायी जात रपेटीचां आनंद घेतला.गुणाजी यांनी तेथून जाताना रिगल नाका येथील फन टाईम दुकानात थांबून जुने मित्र गिरीश पवार यांच्याशी गप्पा मारल्या.असा हा प्रवास दरवर्षी मिलिंद गुणाजी माथेरान मध्ये आल्यावर दरवर्षी करीत असतात.