'मी 350 मुलींसोबत...' गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली; उघडली काळ्या कृत्याची डायरी
‘बिग बॉस ७’ची विजेती गौहर खान हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांसोबतच ती अनेक चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहणारी गौहर खान कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आली आहे. गौहर खानचा साखरपुडा बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेता साजिद खानसोबत झाला होता. त्यांचं लग्नही होणार होतं. मात्र अभिनेत्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं. खुद्द साजिद खाननेच याची कबुली दिली होती.
‘कभी खुशी कभी गम’मधील छोटी करीना होणार लवकरच आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
साजिद आणि गौहर अनेक कार्यक्रमामध्ये एकत्र स्पॉट झाले होते. ते दोघेही एकमेकांसोबत आपआपल्या नात्याबद्दल खूप गंभीर होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण त्यांचे नाते पूर्ण होऊ शकले नाही. साजिद खानने दूरदर्शनला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. तो गौहर खानसोबत वर्षभर रिलेशनशिपमध्ये होता, असं त्याने मुलाखतीत सांगितलं. त्यांच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल बोलताना साजिदने खुलासा केला की, “मी आणि गौहर वर्षभर एकत्र होतो. ती खरंच खूप एक सुंदर मुलगी आहे. मला शोमध्ये सार्वजनिकरित्या मुलींती नावं घ्यायला आवडत नाही, पण जगाला त्याबद्दल माहिती असल्याने, ते ठीक आहे. आमच्या लग्नाची बातमी माध्यमांमध्येही प्रसिद्ध झाली.
अबब! करण जोहरची संपत्ती पाहून डोळेच गरगरतील; ‘असा’ आहे राजेशाही थाट
“मी अनेक मुलींसोबत फिरायचो आणि त्यांच्याशी खोटं बोलायचो. मी प्रत्येक मुलीला आय लव्ह यू म्हणायचो आणि प्रत्येकीला माझ्याशी लग्न करशील का? असं विचारायचो. माझी आत्तापर्यंत ३५० लग्न व्हायला हवी होती. पण, नाही झाली. जेवढ्या मुलींसोबत मी रिलेशनशिपमध्ये होतो तेवढ्या मुली मला मिस करत असतील आणि मला शिव्याही देत असतील”, असं खुलासा देखील मुलाखतीत साजिद खानने केला होता. साजिद खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर गौहर खानने रिॲलिटी शोमध्ये पाऊल ठेवलं. ती ‘बिग बॉस ७’ची विनर होती. यादरम्यानच तिची कुशाल टंडनसोबत रेशीमगाठ जुळली. मात्र ‘बिग बॉस’ संपल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर गौहर खानने जेद दरबारसोबत लग्न करत संसार थाटला. त्यांना जेहान नावाचा एक मुलगा आहे. तर आता गौहर खान दुसऱ्यांदा आई होणार आहे.