Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संदीप पाठकवर मित्रांकडून प्रेमाचा वर्षाव, ‘वऱ्हाड निघालं लंडनला’चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय

‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या नाटकाचा ६०० वा प्रयोग मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रयोगात एक खास सरप्राईज देण्यात आले, ज्यामुळे हा क्षण अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरला. प्रेक्षकांसोबतच कलाकारांनीही या यशाचा आनंद साजरा केला.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 21, 2026 | 02:41 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या नाटकाचा ६०० वा प्रयोग मोठ्या उत्साहात पार पडला.अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या विशेष प्रयोगाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदाचे वातावरण होते.या प्रयोगात एक खास सरप्राईज देण्यात आले, ज्यामुळे हा क्षण अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरला. प्रेक्षकांसोबतच कलाकारांनीही या यशाचा आनंद साजरा केला.

अभिनेता संदीप पाठक  ला त्याच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज हा या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला. मिलिंद कुलकर्णी, निलेश चांडक, डॉ. सुशील मुगडिया, सुशील जेठलिया, अॅड. वर्षा मुंदडा, डॉ. प्रसाद देशमुख आणि संजय सावंत या संदीपच्या सर्व मित्रांनी एकत्र येत विमानाचं भव्य कटआऊट तयार केलं होतं. नाट्यगृहात प्रवेश करतानाच जणू विमानात चढत आहोत, असा अनोखा अनुभव देणारी आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेड कार्पेटसह केलेल्या या खास मांडणीमुळे वातावरण अधिकच उत्साही बनले. रांगोळी, सनई-चौघडे आणि प्रेक्षकांना अत्तर लावून स्वागत अशा पारंपरिक पद्धतीने संपूर्ण वातावरण उत्सवमय झालं होतं. यावेळी केक कटिंगसोबतच शाल-श्रीफळ देऊन अभिनेता संदीप पाठक तसेच नाट्यनिर्माते संदीप सोनार आणि समीर हंपी या निर्मात्यांचा सन्मान करण्यात आला.

PM मोदींच्या विधानाने खळबळ; भारतात येणार का कोरियन स्टार्स? K-Pop आणि K-Drama चाहत्यांसाठी मोठी खुशखबर

या अनपेक्षित सन्मानाने भारावलेल्या संदीप पाठकने भावना व्यक्त करत सांगितलं, ‘आयुष्यात मी खरंच काही कमावलं असेल, तर ती माणसं आहेत. मित्र-मैत्रिणी, कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या साथीनं हा प्रवास शक्य झाला. आजच्या धावत्या जगात असं मनापासूनचं सरप्राईज मिळणं म्हणजे आयुष्यभर जपण्यासारखी आठवण आहे’ प्रकाशझोतात दिसणाऱ्या प्रत्येक यशामागे अनेक अनामिक हातांचा वाटा असतो, याची जाणीव करून देणारा हा सोहळा ‘वऱ्हाड निघालं लंडनला’च्या यशात आणखी एक सुवर्णक्षण ठरला.

Bigg Boss Marathi 6 मध्ये यश मिळवल्यानंतर तन्वी कोलते चर्चेत, भावाच्या आठवणीतून उलगडला तिचा संघर्ष आणि आत्मविश्वासाचा प्रवास

ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी गाजवलेलं ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ हे एकपात्री नाटक अनेक वर्षांपासून मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. हे नाटक अभिनेता संदीप पाठक ने  नव्या पिढीपर्यंत पोहोचवत महाराष्ट्रभर यशस्वी प्रयोगांद्वारे सादर केलं आहे. अस्सल मराठवाडी बोली, ५२ विविध व्यक्तिरेखांचा बहारदार आविष्कार, वेगवेगळ्या आवाजांची रंगत आणि प्रचंड ऊर्जा यामुळेहे नाटक आजही तितकंच लोकप्रिय आणि ताजं वाटतं.प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आणि नाटकाची सातत्यपूर्ण लोकप्रियता यामुळे ‘वऱ्हाड’ मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचं आणि अविस्मरणीय सादरीकरण ठरत आहे.

Web Title: Sandeep pathak was showered with love by friends as the 600th performance of the play varhad nighala londonla turned out to be an unforgettable milestone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • Sandeep Pathak

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.