(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले दणक्यात पार पडला. सीझन 6 च्या महाविजेत्याची घोषणा करण्यात आली. महिलेने ट्रॉफी जिंकत नवा इतिहास रचला आहे. संपूर्ण सीझनभर सातत्यपूर्ण कामगिरी, टास्कमधील ठाम भूमिका आणि प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा यामुळे हा विजय विशेष ठरला. घरातील संघर्ष, मैत्री, रणनीती आणि भावनिक क्षण यांचा योग्य समतोल साधत तिने शेवटपर्यंत दमदार खेळ केला.या सीझनची विजेती दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी कोलते ठरली आहे. तिच्या विजयामुळे चाहत्यांमध्ये आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण असून सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तिचा विजय होताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तिच्या कुटुंबासोबतच ग्रामस्थांमध्येही आनंदाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नुकतेच तन्वीच्या भावाने तिची आठवण शेअर केली आहे. ”तन्वी हिचे लहानपणीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे कोकणातील गावातच झाल. लहानपणापासूनच तिला डान्स,एक्टिंग,ब्युटी कॉन्टेस्ट या सगळ्याची आवड होती तिने यापूर्वी मीच गोवा या स्पर्धेतही भाग घेतला होता यामध्येही तिला यश मिळालं होतं. त्यानंतर ती छोट्या मोठ्या मालिकांमधून काम करू लागली. मात्र बिग बॉस स्पर्धा आपण नक्कीच जिंकू हा आत्मविश्वास तिने या स्पर्धेत सहभागी होतानाच व्यक्त केला होता अशी मोठी आठवण तिचा लहान भाऊ चिन्मय कोलते ने सांगितली.”
Bigg Boss Marathi च्या फायनलमध्ये विजेती ठरलेल्या तन्वी कोलते हिच्या यशानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथे आनंदाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तिच्या यशामुळे ग्रामस्थ आणि कुटुंबीयांमध्ये मोठा अभिमानाचा माहोल निर्माण झाला आहे. तन्वीने बिग बॉसच्या घरात प्रवेश करतानाच कुटुंबीयांना “मी नक्की विजयी ट्रॉफी घेऊन येईन” असा आत्मविश्वास व्यक्त केला होता, अशी आठवण तिचा भाऊ चिन्मय कोलते यांनी सांगितली. त्यांनी सांगितले की, “दीदीला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. तिचं हे यश आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे.”
तन्वीने याआधीही विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे. तिने मिस गोवा हा किताबही पटकावला आहे. शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर, तिचं प्राथमिक शिक्षण साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयात झालं. त्यानंतर तिने देवरूख-आंबव येथील राजेंद्र माने विद्यालयातून डिप्लोमा पूर्ण केला आणि पुढे पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
तन्वी ही साखरपा येथील नारळ व उदबत्तीचे होलसेल व्यापारी कै. उदय कोलते यांची कन्या आहे. तिच्या या यशानंतर आई शर्मिला कोलते आणि भाऊ चिन्मय यांनीही आनंद व्यक्त केला असून संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.






