संजय दत्त (Sanjay Dutt) जेव्हा एका चित्रपटाचं शूटींग करत होता तेव्हा त्याला समजलं होतं की त्यांना लंग कॅन्सर (Lung Cancer) आहे. त्यावेळी संजय दत्तला पुढे काय करावं हे खरोखर सुचत नव्हतं. तो काळ खूप भयानक होता. संजय दत्तने आपलं आजारपण आणि उपचार याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
संजय दत्तने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात (Sanjay Dutt On Cancer Battle) केली आहे. त्यानंतर त्याने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे. संजयने कर्करोगासारख्या मोठ्या आजारावर मात केली असली तरी एक वेळ अशी होती जेव्हा संजय दत्तला मरण स्वीकारावं असं वाटत होतं.
संजय दत्त गेल्या वर्षी ‘केजीएफ 2’ (KGF 2) या सिनेमात झळकला होता. त्याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजयने त्याच्या कर्करोगाच्या प्रवासाविषयी भाष्य केलं आहे.
संजय दत्त म्हणाला,‘केजीएफ 2’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मला पाठदुखीचा खूप त्रास होत होता. ‘केजीएफ 2’ (KGF 2) या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी सारखा पाठदुखीचा त्रास होत असल्याने मी औषधं आणि गरम पाणी पित होतो. त्यानंतर एकेदिवशी अचानक मला श्वसनाचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे मी डॉक्टरना भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी मला कर्करोग झाला असल्याचं सांगितलं. पण मला केमोथेपरी घ्यायची नव्हती . त्यामुळे मी आयुष्य संपवण्याची इच्छा व्यक्त केली.
[read_also content=”शाहिद कपूर आणि विजय सेतूपतीचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण, ‘फर्जी’च्या ट्रेलरवर बेस्ट कॉम्बोच्या कमेंट्स https://www.navarashtra.com/gallery/shahid-kapoor-and-vijay-setupati-digital-debut-in-farzi-web-series-nrsr-361426/”]
संजय दत्त पुढे म्हणाला, आमच्या घरात कर्करोगाचा खूप जुना इतिहास आहे. माझी आई नर्गिसचंदेखील कर्करोगामुळे निधन झालं होतं. तसेच माझी पहिली पत्नी रिचा शर्मा हिनेदेखील ब्रेस्ट कॅन्सरमुळे जगाचा निरोप घेतला. मात्र मला कर्करोग झाला तेव्हा माझी पत्नी मान्यता दत्त आणि बहिण प्रिया आणि नम्रता दत्त यांनी माझी खूप काळजी घेतली. डॉक्टरांच्या मदतीमुळे मी या गंभीर आजारावर मात करू शकलो.