SatyaPrem Ki Katha बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा आगामी चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’चा टीझर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी पहिल्यांदा ‘भूल भुलैया’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती. आता पुन्हा एकदा दोघेही ‘सत्यप्रेम की कथा’मध्ये रोमान्स करताना दिसणार आहेत.
चित्रपटाच्या नावावरून प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. पण, यावेळी कथेचा अँगल जरा वेगळा आहे. लग्नानंतर जोडप्यांना येणाऱ्या अडचणी या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सत्यप्रेमची कथा गुजरातच्या पार्श्वभूमीवर बेतली आहे. चित्रपटात कार्तिकने एका साध्या गुजराती मुलाची भूमिका केली आहे. जो लग्नासाठी खूप उत्सुक आहे. तर, कियाराने एका मॉर्डन गुजराती मुलीची भूमिका केली आहे, जी आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहे. सत्यप्रेम कथाला मिळवण्यासाठी कोणताही धोका पत्करण्यास तयार आहे. दरम्यान, या दोघांचे लग्न होईल, अशा पद्धतीने कथा फिरते.
कार्तिक आणि कियारा या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. कियाराने आपल्या इन्स्टांग्रामवर लाल रंगाच्या थ्री पीसमध्ये कियारा अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांनी भरपूर कमेंटस् करत तिचं कौतुक करत आहे.
नुकतचं या चित्रपटातील गुजराती स्टाईल गाणं रिलीज झालं आहे. कार्तिक आणि कियाराची केमिस्ट्री आणि जबरदस्त डान्सिंग स्टाईलमुळे लाखो लोकांनी गाण्याला पसंती दर्शवली आहे.
लग्नाच्या या गुंतागुंतीच्या नात्यात दोघेही एकत्र राहू शकणार की वेगळे होणार, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट हा 29 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट नावामुळे आधीच वादात सापडला होता. या चित्रपटाचे नाव सुरुवातीला ‘सत्यनारायण की कथा’ असे होते. मात्र, काही समुदायाने यावर आक्षेप घेताच हे नाव बदलण्यात आले.