सातही खंडांवर मिळालेला गौरव हा त्यांचं जागतिक लोकप्रियतेचा स्पष्ट पुरावा आहे. आशिया पासून अफ्रिका, युरोप ते ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत SRK ने सर्वत्र आपलं अधिराज्य गाजवलं आहे. विशेष म्हणजे, हे करण्याचा भाग्य लाभलेला तो एकमेव अभिनेता आहे.
किंग खान म्हणजेच बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान… त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये आजतागायत कायम आहे. त्याचं घर मुंबईतल्या बांद्रामध्ये आहे. त्याच्या मन्नत बंगल्यासमोर रोज हजारो फॅन्स येतात, फोटो काढतात आणि निघून जातात. त्यातले क्वचित काही फॅन्स असतील त्यांना किंग खानची झलक पाहायला मिळते. देशातल्या कानाकोपऱ्यात, जगभरात शाहरूख खानचा चाहतावर्ग आहे. किंग खानचा चित्रपट येणार म्हटल्यावर चाहत्यांसाठी तर त्यादिवशी खास दिवाळीच असते. त्याच्या घरासमोर आणि बंगल्यासमोर चाहत्यांचा तर नुसता जलवाच असतो. पण, शाहरूखचा यावर्षी एकही चित्रपट आला नाही. पण तरीही त्याने भाईजान, बिग बी बच्चन आणि खिलाडी कुमारसह इंडस्ट्रीतल्या दिग्गज कलाकारांना एका कारणात मागे टाकलंय, नेमकं ते कारण काय जाणून घेऊया…
“आई आणि बाबा रिटायर होत आहेत!”, स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना नव्या मालिकेची मेजवानी
फॉर्च्यून इंडियाची सप्टेंबर २०२४ मध्ये सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर झाली. त्या यादीमध्ये, सलमान खान, अमिताभ बच्चन, विराट कोहली आणि शाहरुख खान यासारखे सुपरस्टार टॉप ५ मध्ये आहेत. पण सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचा बादशाह दस्तूर खुद्द शाहरूख खान पहिल्या क्रमांकावर आला आहे. एकही प्रोजेक्ट हातात नसतानाही इतका टॅक्स अभिनेत्याने भरल्यामुळे तो चर्चेत आला आहे. याच यादीनुसार शाहरुख खानने २०२३- २४ मध्ये तब्बल ९२ कोटी रुपयांचा कर भरला आहे.
शाहरुख खाननंतर तामिळ सुपरस्टार थलापती विजयच्या नावाचा समावेश होतो. त्याने या वर्षी तब्बल ८० कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. तर सलमान खानने ७५ कोटी आणि बिग बी बच्चन यांनी ७१ कोटी रुपयांचा कर भरला आहे. सेलिब्रिटी करदात्यांमध्ये क्रिकेटर विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांचेही नाव यादीत आहे. विराट कोहलीने ६६ कोटी रुपयांचा कर भरला आहे. अजय देवगनने ४२ कोटी तर महेंद्रसिंह धोनी यांनी ३८ कोटी रुपयांचा कर भरला आहे.
समांथा रुथ प्रभूवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन
शाहरुखचे २०२३ मध्ये पठान, जवान आणि डंकी हे सुपरहिट चित्रपट रिलीज झाले होते. पण २०२४ मध्ये त्याचा एकही चित्रपट रिलीज झाला नव्हता. असं असतानाही किंग खान सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे. शाहरूखने जानेवारी २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘पठान’च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर जबरदस्त पुनरागमन केले. या तीनही चित्रपटांच्या माध्यमातून त्याने २५०० कोटींची जबरदस्त कमाई केली. ‘पठान’ आणि ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई झाली होती, मात्र ‘डंकी’चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही.